IMPIMP

Maharashtra Karnataka Seemawad | बेळगावातील दगडफेकीचे पडसाद पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये

by nagesh
Maharashtra Karnataka Seemawad | belgaum dispute backfire in pune jai maharashtra painted by thackeray group on karnataka buses at swargate station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेला सीमावाद (Maharashtra Karnataka Seemawad) काही केल्या शांत होत नाही. मंगळवारी (६ डिसेंबर) सकाळी महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकमधील बेळगाव येथील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ दगडफेक करण्यात आली. महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्लाबोल करत कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटले आहेत. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या वाहनांना काळं फासलं आहे. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्रातील सीमावाद (Maharashtra Karnataka Seemawad) अजून पेटण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कर्नाटक पासिंगच्या गाड्यांच्या काही गाड्या पुण्यातील स्वारगेट बस डेपोत उभ्या होत्या. त्यांच्या नंबरप्लेटवर काळं फासण्यात आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत कर्नाटकच्या गाड्यांना काळं फसले आहे. तसेच कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा लिहून रंगरंगोटीही करण्यात आली आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
शिवसेनेच्या सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई
केली जाणार असल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली.
दरम्यान, आज सकाळी बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करून
सहा गाड्यांच्या काचा फोडल्या. पुण्यात झालेल्या आंदोलनात कोणत्याही गाडीचे नुकसान करण्यात आले नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Karnataka Seemawad | belgaum dispute backfire in pune jai maharashtra painted by thackeray group on karnataka buses at swargate station

 

हे देखील वाचा :

Maharashtra Karnataka Seemawad | महाराष्ट्र पोलिसांना अलर्ट, सीमाभागाच्या महामार्गांवरील बंदोबस्तात वाढ

Pune Crime | तरुणींना म्हणाले, ‘चल बैठ घुमने जाते है’ आणि गेले पोलीस काेठडीत

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

 

Related Posts