IMPIMP

Investment Tips | जर तुमच्याकडे असतील 2-5 लाख रुपये, तर या ठिकाणी करा गुंतवणूक, FD पेक्षा चांगला मिळू शकतो रिटर्न

by nagesh
 Investment Tips | invest 2 to 5 lakh rupees in reit sgb index funds to get better returns than fd

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Investment Tips | जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. सहसा लोक FD मध्ये एकरकमी रक्कम गुंतवतात. ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. लॉक-इन कालावधी संपल्यानंतर, त्यात विशिष्ट व्याज जोडले जाते. परंतु सध्याच्या काळात, तुमच्याकडे FD व्यतिरिक्त बरेच पर्याय आहेत, जेथे तुम्ही गुंतवणूक केल्यास एफडीपेक्षा चांगला रिटर्न मिळू शकतो. आर्थिक बाबींच्या सल्लागार शिखा चतुर्वेदी यांनी सांगितलेले गुंतवणुकीचे चांगले मार्ग, जे भविष्यात चांगला नफा देऊ शकतात ते जाणून घेवूयात. (Investment Tips)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

1. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (Real Estate Investment Trust)

 

तुमच्याकडे 2 लाख, 5 लाख किंवा याहून जास्त रक्कम असल्यास आणि त्यासाठी चांगली गुंतवणूक योजना शोधत असल्यास रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट
ट्रस्ट (REIT) मध्ये गुंतवणूक करा. हे एक प्रकारे म्युच्युअल फंडासारखेच आहे, परंतु यामध्ये तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याऐवजी प्रॉपर्टीवर पैसे
गुंतवता. यातून ते कंपन्या लाँच करतात, ज्यांच्याकडे व्यावसायिक मालमत्ता आहे. (Investment Tips)

 

यामध्ये सर्वसामान्यांकडून पैसे घेऊन मॉल्स, पार्क आदी मोठ्या मालमत्ता खरेदी केल्या जातात. REIT मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुमच्याकडे फक्त
डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते असणे आवश्यक आहे. युनिट होल्डर म्हणून, तुम्हाला डिव्हिडंट आणि REIT च्या वाढीव मूल्याच्या रूपात कमाई होईल.
परंतु ते खरेदी करताना, एकदा तुम्ही पाहिले पाहिजे की अंडरलाईंग असेट चांगली असली पाहिजे, तरच तुम्हाला फायदा मिळेल.

 

 

2. इंडेक्स फंड (Index fund)

 

इंडेक्स फंड एखाद्या मार्केट इंडेक्सला ट्रॅक करतो, त्याचे रिटर्न्स देखील जवळपास इंडेक्सने ऑफर केलेल्या सारखेच असतात. यामध्ये कमी जोखीम घेऊन जास्त रिटर्नचा लाभ घेता येतो. इंडेक्स फंड ही कमी खर्चाची गुंतवणूक मानली जाते.

 

जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास संकोच करत असाल, किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची निवड करू शकत नसाल, तर तुमच्यासाठी इंडेक्स फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. याशिवाय, जर तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर इंडेक्स फंडांमध्येही एसआयपी करता येते. इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही हाउस ऑफ फंड्सची अधिकृत वेबसाइट किंवा कोणतेही अ‍ॅप वापरू शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

3. सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond)

 

सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये एक ग्रॅम सोने खरेदी करून गुंतवणूक सुरू करू शकतात.
हे एक प्रकारे 999 शुद्धतेचे सोने डिजिटल पद्धतीने खरेदी करण्यासारखे आहे.
त्याचा लॉक इन कालावधी 8 वर्षांचा आहे. 8 वर्षांनंतर पैसे काढल्यावर कोणताही कॅपिटल गेन टॅक्स नाही.
परंतु याआधी पैसे काढल्यास तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल.

 

यामध्ये, गुंतवणूकदाराला वार्षिक 2.5% व्याज मिळते, जे सहामाही आधारावर दिले जाते.
तेही जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे. यामध्ये आठ वर्षांत गुंतवलेल्या रकमेवर 20% व्याज मिळू शकते.
पैसे काढल्यावर, सोन्याच्या बाजारभावाच्या आधारे पेमेंट केले जाते आणि यामध्ये तुम्हाला सोन्याच्या किमतीतील वाढीचा फायदा देखील मिळतो.

 

 

Web Title: Investment Tips | invest 2 to 5 lakh rupees in reit sgb index funds to get better returns than fd

 

हे देखील वाचा :

Pune Crime | डंपरच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यु; लोहगावातील पठारेवस्तीतील घटना

Pune PMC News | सुविधा हव्यात तर जास्तीचा मिळकत कराची तयारी ठेवावी लागणार; प्राथमिक सर्वेक्षणात कॅपिटल टॅक्समधून दुप्पट उत्पन्न मिळण्याचा अंदाज

 

 

Related Posts