IMPIMP

‘रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट, आमदारावर ठेवली होती पाळत’ : जितेंद्र आव्हाड

by bali123
ips officer rashmi shukla is bjp agent say ncp minister jitendra awhad

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर निशाणा साधत सडकून टीका केली आहे. शुक्ला या भाजपच्या एजंट होत्या असं ते म्हणाले आहेत. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर हे महाविकास आघाडीत येऊ नये म्हणून त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. रश्मी शुक्ला यांनी त्यांना पैशांची ऑफर दिली होती असंही आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत फोन टॅपिंग प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावरही निशाणा साधला.

‘रश्मी शुक्लांनी येड्रावकर यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर पाळतही ठेवली होती’
जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad म्हणाले, शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर भाजपमध्ये न जाता ते महाविकास आघाडीत प्रवेश करणार होते. परंतु रश्मी शुक्ला यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यावर दबाव आणला. त्यांना पैशांची ऑफरही दिली होती. त्यांनी येड्रावकर यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्यांच्यावर पाळत देखील ठेवली होती असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

‘भाजपचं ऐकत नाहीत त्यांचं आयुष्य उध्वस्त करण्याचा विरोधकांचा प्रयत्न, शुक्लांमुळं अधिकारी अस्वस्थ’
पुढं बोलताना आव्हाड म्हणाले,  रश्मी शुक्ला यांनी माफी मागून कारवाईचं पत्र परत मिळवलं होतं. हो आम्हाला मान्य आहे की, काही अधिकारी ओळखण्यात आम्ही कमी पडलो. जे अधिकारी भाजपचं ऐकत नाहीत त्यांचं आयुष्य उध्वस्त करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. यापुढे काही टॅपिंग समोर आल्या तर त्याला जबाबदार रश्मी शुक्ला याच असतील. रश्मी शुक्ला यांच्यामुळं अधिकारी अस्वस्थ झाले आहेत.

Also Read :

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

 

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

Related Posts