IMPIMP

एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

by bali123
Central Bank Of India | central bank of india to shut down 600 of its branches report

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याकडे बँकेशी संबंधित पेंडींग कामे असल्यास ती याच आठवड्यात करणे हा एक चांगला पर्याय असेल. वास्तविक, मार्च 2021 च्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बँकांना सुट्टी bank holiday आहे. एप्रिल 2021 मध्येही बँका केवळ 17 दिवस उघडतील. बँक 27 मार्च ते 4 एप्रिल 2021 पर्यंत दोनच दिवस उघडेल. दरम्यान 27 मार्च रोजी महिन्याच्या चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. दुसर्‍या दिवशी रविवार असल्याने सुट्टी असेल. या दोन्ही दिवस सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात बँका बंद राहतील. यानंतर होळी महोत्सव असल्याने, 29 मार्चला सुट्टी असेल.

‘हिंमत असेल तर भ्रष्टाचाराचा पुरवा द्या, उगाच येड्यावानी गावभर बोंबलत फिरु नका’

31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी बँकांमध्ये उपलब्ध होणार नाही ग्राहक सेवा
होळीनिमित्त पाटण्यांमध्ये सलग चार दिवस बँका बंद bank holiday राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) अधिकृत वेबसाइटनुसार ग्राहकांना पाटण्यात 30 मार्च 2021 रोजी शाखेत जाता येणार नाही. दुसर्‍या दिवशी म्हणजेच 31 मार्च चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सुट्टीनंतरही ग्राहकांची कामे होणार नाहीत. एप्रिल 2021 मध्ये बँकेचा पहिला कार्य दिवस 3 रोजी असेल. वास्तविक, एप्रिल 2021 मध्ये बँकांची वार्षिक खाती बंद झाल्यामुळे ग्राहक सेवा दिली जाणार नाही. त्यानंतर शुक्रवार, 2 एप्रिलला गुड फ्रायडेला सुट्टी असेल. यानंतर, 4 एप्रिल रोजी रविवार आहे. 5 एप्रिलला बाबू जगजीवन राम जयंतीला सुट्टी असेल.

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

दरम्यान, सर्व राज्यांमध्ये बँकांना 13 दिवसांची सुट्टी नसणार कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकत्रित साजरे होत नाहीत. तेलगू नववर्ष, बिहू, गुढी पाडवा, वैशाख, बिजू महोत्सव आणि उगाडी या दिवशी बँकांना 13 एप्रिल रोजी सुट्टी असेल. दुसर्‍या दिवशी म्हणजेच 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती असल्याने काम बंद असेल. त्यानंतर 15 एप्रिल रोजी हिमाचल दिन, विशु, बंगाली नववर्ष, सिरहुल काही राज्यांत सुट्टी असेल. यानंतर 21 एप्रिलला रामनवमी आणि 25 एप्रिलला महावीर जयंतीसाठी सुट्टी असेल. यासह, बँकांमध्ये 10 आणि 24 एप्रिल रोजी दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल. 4, 11 आणि 18 एप्रिल रोजी रविवारी सुट्टी आहे.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Related Posts