IMPIMP

IPS Officer Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुल्का यांना क्लिन चिट मिळणार?

by nagesh
IPS Officer Rashmi Shukla | pune police files closure report in case against ips officer rashmi shukla clean chit in case of phone tapping

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राजकीय नेत्यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी (Phone Tapping Case) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांच्या अडचणी आता संपल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट (Clean Chit) देण्यात आली आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी मुख्य दंडाधिकारी न्यायालयात (Chief Magistrate) ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांच्यावर जून मध्ये 700 पानांचे आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) त्यांना अटकेपासून 6 जुलैपर्यंत संरक्षण दिले होते.

 

विधानसभेच्या 2019 मध्ये निवडणूका झाल्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापनेची हलाचल सुरु झाली होती. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांचा 60 दिवस, तर राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला होता. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात (Colaba Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. वेगळ्या कारणासाठी परवानगी घेऊन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांनी या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला. फोन टॅपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सायबर विभागाने (Cyber Division) गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फोन टॅपिंगप्रकरणी आरोपपत्रानंतर खटला चालविण्याासाठी परवानगी मिळावी,
यासाठी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारकडे (Central Government) प्रस्ताव सादर केला होता.
आता नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात क्लोजर रिपोर्ट (Closure Report) दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांकडून (Pune Police) न्यायालयामध्ये अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
यामध्ये शक्ला यांना क्लिन चिट देण्यात आली आहे.
हा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला तर रश्मी शुक्ला यांची केस बंद होणार आहे.

 

Web Title :- IPS Officer Rashmi Shukla | pune police files closure report in case against ips officer rashmi shukla clean chit in case of phone tapping

 

हे देखील वाचा :

Womens Asia Cup | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने केलेल्या ‘या’ चुकीमुळे भारताला गमवावा लागला सामना

Deepak Kesarkar | टीईटी घोटाळ्यातील दोषी शिक्षकांसंदर्भात दीपक केसरकर यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले…

Wrestler Sarah Lee Passed Away | WWE स्टार सारा ली चे वयाच्या 30 व्या वर्षी निधन

 

Related Posts