IMPIMP

Deepak Kesarkar | टीईटी घोटाळ्यातील दोषी शिक्षकांसंदर्भात दीपक केसरकर यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले…

by nagesh
Deepak Kesarkar| free textbooks along with books from next year education minister deepak kesarkar announced on the occasion of padwa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात गाजलेल्या टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam Case) अनेक शिक्षकांवर कारवाई
करण्यात आली आहे. टीईटी परिक्षेतील घोटाळ्यात जे दोषी आढळले आहेत त्यांच्यासंदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी
पुण्यात मोठे वक्तव्य केले आहे. टीईटी परिक्षेतील घोटाळ्यात जे दोषी आढळले त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल. काही वर्षांनी त्यांना सुधारण्याची संधी
दिली जाईल. मात्र त्याआधी आता जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पुण्यात पत्रकारांशी
बोलताना सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, माझ्या शरीरात एका बापाचे हृदय देखील आहे. त्यामुळे मी कोणत्याच विद्यार्थ्यांचं किंवा शिक्षकांचं (Teachers) नुकसान होऊ देणार नाही. पोलिसांच्या चौकशीत जे शिक्षक दोषी ठरले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. त्यांना वगळूनच परीक्षेचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर केला जाईल. मात्र, ज्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे ही परीक्षा दिली त्यांनाही योग्य न्याय मिळेल, असेही केसरकर यांनी म्हटले.

 

 

उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार

दसरा मेळाव्यानंतर (Dasara Melava 2022) माझ्याबाबत उद्धव ठाकरे काहीही बोलले तरीही मी काहीही उत्तर देणार नाही, असं मी ठरवलं होतं. मात्र त्यांच्या भाषणात आमच्या आमदारांबाबत (Shinde Group MLA) आणि सरकारबाबत काहीही टीका केली गेली. त्या मुद्याबाबत शिंदे गटाचा मुख्य प्रवक्ता (Spokesperson) म्हणून उत्तर देईन. त्यात उद्धव ठाकरेंना कमी लेखण्याची माझी कोणतीही भूमिका नाही. दसरा मेळाव्यात झोपलो नव्हतो, मी विचार करत होतो मी झोपलो असतो तर माझे हात हलले नसते, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.

 

 

 

डुक्कर ही भाषा ठाकरेंच्या तोडी शोभत नाही

केसरकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणातील वक्तव्यांमुळे मी अस्वस्थ झालो. डुक्कर ही भाषा संजय राऊतांच्या (Sanjay Raut) तोंडी शोभते. उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही. एकनाथ शिंदेंचा (CM Eknath Shinde) मला अभिमान आहे. त्यांच्याबद्दल उद्धव ठाकरे जे बोलले, त्यामुळे अस्वस्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आमदारकीचा हट्ट करणार नाही

अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri By-Election) शिवसेनेची (शिंदे गटाची) भाजपसोबत (BJP) युती आहे.
त्यांनी जर आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडलं तर एका आमदारकीसाठी आम्ही हट्ट करण्यात अर्थ नाही,
त्यामुळे आमदारकीचा हट्ट करणार नसल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलंय.

 

 

Web Title :- Deepak Kesarkar | students in tet scam can be given re examination said deepak kesarkar

 

हे देखील वाचा :

Wrestler Sarah Lee Passed Away | WWE स्टार सारा ली चे वयाच्या 30 व्या वर्षी निधन

Ahmednagar Crime | प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या सख्या बहिणाचा खून करुन रचला आत्महत्येचा बनाव, आरोपी बहिणीवर FIR

Chitra Wagh On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका, म्हणाल्या – ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला…’

 

Related Posts