IMPIMP

Janseva Foundation Katraj | पुण्याच्या कात्रज येथील जनसेवा फौंडेशनने केला निराधार मुलीचा विवाह

by nagesh
Janseva Foundation Katraj | Janseva Foundation at Katraj, Pune news

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Janseva Foundation Katraj | येथील जनसेवा फौंडेशनचे कात्रज, भिलारेवाडी येथे निराधार मुला – मुलींचे पुनर्वसन केंद्र असून तेथील कुमारी पूनम संजय खाटपे या निराधार मुलीचा वडकी येथील चि. तुषार हरिभाई मोडक या मुलाशी विवाह करून देऊन कन्यादान केले. कु. पूनम ही अगदी लहानपणापासून, २-३ वर्षाची असल्यापासून या निराधार पुनर्वसन केंद्रात होती. फौंडेशनने तिचे १० वी, १२ वी आणि नंतर नर्सिंग असे शिक्षण केले. अशा या निराधार मुलीचा मोडक कुटुंबीयांनी स्वीकार केला. त्याबद्दल जनसेवा फौंडेशनला (Janseva Foundation Katraj) मोडक कुटुंबीयांविषयी कायम आदर वाटेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

जनसेवा फौंडेशनतर्फे नेहेमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. जेष्ठ नागरिक, वंचित, निराधार इ. साठी कार्य करीत आहे. भिक्षेकरी मुलांसाठी विशेष प्रकल्प राबवित आहे. यामध्ये त्यांचे शिक्षण, आरोग्य सांस्कृतिक विकास इ. वर विशेष भर देण्यात येत आहे. वृद्धाश्रम, ग्रामीण रुग्णालय, ग्रामविकास, फिरते रुग्णालय, इ. प्रकल्प ठळकपणे राबविले जातात. तसेच अनेक अनाथ मुले, मुली, जेष्ठ नागरिक यांना वैयक्तिक मदत केली जाते. याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून या निराधार मुलीचे लग्न करून देण्यात आले.

या प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी फौंडेशनचे (Janseva Foundation Katraj) अध्यक्ष डॉ. विनोद शहा (Dr. Vinod Shah),
प्रकल्प प्रमुख मिना शहा (Meena Shah), विश्वस्त कैलाश पटेल (Kailash Patel), डॉ राजन पटेल (Dr. Rajan Patel),
विश्वस्त श्री नानजीभाई शहा (Nanajibhai Shah), जनसेवा फौंडेशनचे विश्वस्त,कोठारी व्हील्सचे राजेंद्र कोठारी (Rajendra Kothari),
चंचला शशिकांत कोठारी (Chanchala Kothari), पोलीस अधिकारी सुरेश मिरगे (Suresh Mirge), तसेच सरस्वती अनाथआश्रम,
वाघोली येथील शिवलाल जाधव इ. मान्यवर उपस्थित होते. डॉ. विद्युत पटेल व बीना पटेल यांनी संस्थेच्या वतीने कन्यादान केले.
सौ. कैलाश पटेल यांनी हा विवाह जुळविण्याचे महत्वपूर्ण कार्य केले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

संस्थेचे विश्वस्त प्रा. जे. पी. देसाई यांनी सर्व निमंत्रितांचे स्वागत केले. सहभोजनाचा आस्वाद घेऊन हा सुंदर विवाह सोहळा संपन्न झाला.
अशी माहिती जनसेवा फाऊंडेशनचे खजिनदार राजेश शहा (Rajesh Shah) यांनी दिली.

 

Web Title :- Janseva Foundation Katraj | Janseva Foundation at Katraj, Pune news

 

हे देखील वाचा :

Urvashi Rautela Bold Video | उर्वशी रौतेलानं बोल्ड व्हिडिओ शेअर करून दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी ऋषभ पंतचं नाव घेऊन तिला केलं ‘ट्रोल’

Pune Crime | डोक्यात फोडली बिअरची बाटली; चौघांविरोधात FIR

EPFO Update | केवळ एका चुकीमुळे बंद होईल पीएफ खाते, नंतर ‘हे’ काम केल्याशिवाय होणार नाही अ‍ॅक्टिव्ह; जाणून घ्या

 

Related Posts