IMPIMP

Jason David Frank | पॉवर रेंजर फेम अभिनेत्याचं निधन; मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट

by nagesh
Jason David Frank | power rangers fame jason david frank passed away

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : सध्या पॉवर रेंजरचे फॅन असलेल्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. हॉलिवूड अभिनेता जेसन डेव्हिड फ्रँक (Jason David Frank) यांचे निधन (Jason David Frank Pass Away) झाले आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पॉवर रेंजर फेम (Power Rangers Fame) जेसन डेव्हिड फ्रँक ने चाहत्यांच्या मनात घर केले होते. आता सोशल मीडियावर सर्वत्र फ्रँकवर श्रद्धांजली वाहिली जात आहे. तर फ्रँकच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. (Jason David Frank)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फ्रँक्स ऑन द पॉवर रेंजर्सचा कलाकार वॉल्टर ई. जोन्सने (walterejones) instagram वर पोस्ट शेअर करत जेसन डेव्हिड फ्रँकला श्रद्धांजली वाहिली आहे. तर सध्या सोशल मीडियावर जेसनच्या जाण्याने सगळेजण दुःख व्यक्त करत त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. मात्र जेसन डेव्हिड फ्रँक यांचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र अजून समजू शकलेले नाही.

 

फ्रँकने त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. पावर रेंजर च्या पहिल्या सीझनमध्ये टॉमी ऑलिव्हरची (Tommy Oliver) भूमिका फ्रँकने साकारली होती. हि भूमिका फ्रँकने तब्बल 28 ऑगस्ट 1993 ते 27 नोव्हेंबर 1995 पर्यंत साकारली होती. 14 भागा नंतर त्याची भूमिका संपवण्यात आली होती. मात्र फ्रँकची लोकप्रियता पाहता पुन्हा त्याला वाईट रेंजर आणि उर्वरित मालिकेसाठी कमांडर म्हणून ऑफर मिळाली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फ्रॅंकने रेड झिओ रेंजर (Red Zeo Ranger), रेड टर्बो रेंजर (Red Turbo Ranger)
आणि ब्लॅक डिनो रेंजर (Black Dino Ranger), मायटी मॉर्फिन पॉवर रेंजर्स: द मूव्ही (Mighty Morphin Power Rangers: The Movie)
आणि टर्बो: ए पॉवर रेंजर्स मूव्ही (Turbo: A Power Rangers Movie) या चित्रपटांमध्ये देखील उत्तम भूमिका साकारली होती.
फ्रँक 2009 आणि 2010 मध्ये अनेक मिश्र मार्शल आर्ट बाउटमध्ये (Mixed martial arts bout) लढला.
तेव्हापासून त्याला मिक्स मार्शल आर्टिस्ट (Mixed Martial Artist) म्हणूनही ओळखले जाते.

 

Web Title :- Jason David Frank | power rangers fame jason david frank passed away

 

हे देखील वाचा :

Hengameh Ghaziani | हिजाबशिवाय व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर प्रसिद्ध इराणी अभिनेत्रीला अटक, व्हिडीओ व्हायरल

Pune News | विद्यार्थी साहाय्यक समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव दत्तात्रय उर्फ एन. डी. पाटील यांचे निधन

Pune Crime | प्रेमात अडथळा ठरण्याऱ्या प्रियकराच्या पत्नीचा प्रेयसीने केला खून; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

 

Related Posts