IMPIMP

Jejuri Khandoba Temple | खंडोबा मंदिराचा गाभारा सोमवार पासून दीड महिना बंद, तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामे सुरु होणार

by sachinsitapure
Jejuri Khandoba Temple

जेजुरी : सरकारसत्ता ऑनलाईन – जेजुरीच्या खंडोबा गडावरील मुख्य मंदिराचा (Jejuri Khandoba Temple) गाभारा आणि घोड्याचा गाभारा (सभामंडप) सोमवार (दि.28) पासून दीड महिना बंद राहणार आहे. या कालावधीत दुरुस्तीची कामे (Repair Works) करण्यात येणार आहेत. या काळात भक्तांना कासवापासून खंडोबाचे दर्शन (Jejuri Khandoba Temple) घ्यावे लागणार असून दोन्ही गाभाऱ्यात जाता येणार नाही. दुरुस्तीचे काम 5 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त (Chief Trustee) पोपटराव खोमणे (Poptrao Khomane) यांनी दिली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा (Jejuri Khandoba Temple) अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून परिचित आहे. जेजुरीच्या श्री खंडोबा गडावर महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) वतीने विकास आराखड्यातील (Development Plan) विकास कामे सुरु करण्यात येत आहेत. ऐतिहासिक खंडोबा गडाचे जतन करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल 109 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

 

खंडोबा देवस्थान कार्यालयामध्ये मंदिरातील विकासकामांच्या नियोजनाबाबत पुजारी, सेवक, ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी,
सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुजारी-सेवक व ग्रामस्थांनी अनेक सूचना केल्या.
यामध्ये मुख्य गाभाऱ्याचे काम सुरु असताना गडावर येणाऱ्या भाविकांचे अभिषेक, महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात
करण्यात याव्यात. आतील गाभाऱ्याचे काम झाल्यानंतर पंचलिंग मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.
तेथील काम सुरु झाल्यानंतर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मंदिरात पुजा करु द्याव्यात, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

या बैठकीला मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, ॲड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौंदाडे, मंगेश घोणे,
ॲड. विश्वास पानसे, अभिजित देवकाते, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, प्रमोद चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Posts