IMPIMP

Pune Crime News | जबरी चोरी करणाऱ्या दोघांना मुंढवा पोलिसांकडून अटक, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पण चोरीची

by sachinsitapure
Mundhwa Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | रिक्षाला दुचाकी आडवी घालून चालकाचा (Rickshaw Driver) मोबाईल जबरदस्तीने हिस्कावून चोरून (Mobile Theft) नेणाऱ्या दोघांना मुंढवा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही घटना 23 ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास केशवनगर येथील बाबा कल्याणी बंगल्याजवळील (Baba Kalyani Bungalows) मोकळ्या मैदानाजवळ घडली होती. (Pune Crime News) आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरीची (Vehicle Theft) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अजय महेश देशमुख (वय-22 रा. रेल्वे पटरी जवळ, मांजरी, मुळ रा. लोहगाव, जि. उस्मानाबाद), आकाश बालाजी ढवळे (वय-23 रा. रेल्वे पटरी जवळ, मांजरी, मुळ रा. किल्लारी कार्ला, ता. औसा) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विशाल विनायक भंडारी (वय-30 रा. संभाजी चौक, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

फिर्यादी हे सर्पमित्र असून ते त्यांचे काम संपवून कल्याणी बंगला रोडने रिक्षातून घरी जात होते. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याकडील काळ्या रंगाची स्प्लेंडर सारखी गाडी (एमएच 12 व्हीडी 1575) रिक्षाला आडवी लावून भंडारी यांच्या खिशातील 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्प्लेंडर सारखे वाहन घेऊन दोनजण गुरुकृपा सोसायटी केशवनगर येथे आडोशाला थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.

तपास पथकाने त्या ठीकाणी जाऊन दोघांकडे चौकशी करुन त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्याकडून फिर्यादी यांचा चोरलेला मोबाइल आढळून आला. पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली. चौकशी दरम्यान दुचाकी देखील चोरीची असल्याचे समोर आले. आरोपींनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) भोर पोलीस ठाण्याच्या (Bhor Police Station) हद्दीतून दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. गुन्हा घडल्यानंतर मुंढवा पोलिसांनी तात्काळ दोघांना अटक करुन जबरी चोरी आणि वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख
(ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Senior PI Vishnu Tamhane),
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे (PI Pradeep Kakade), सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे (API Sandeep Jore),
पोलीस अंमलदार दिनेश राणे, दिनेश भांदुर्गे, वैभव मोरे, महेश पाठक, राहुल मोरे, स्वप्नील रासकर, सचिन पाटील
यांच्या पथकाने केली.

Related Posts