IMPIMP

Jumbo Covid Centre Scam | जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात संजय राऊतांसह त्यांचा मित्र अडचणीत, पोलिसांत तक्रार

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on bjp kirit somaiya gets clean chit from mumbai police

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Jumbo Covid Centre Scam | पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Scam) जेलमध्ये असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या सांगण्यावरुन त्यांचे मित्र सुजित पाटकर (Sujit Patkar) यांना जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिले, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (BJP Leader Kirit Somaiya) केला आहे. जम्बो कोविड सेंटरच्या घोटाळा प्रकरणी (Jumbo Covid Centre Scam) सुजित पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खासदार संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुंबई महापालिकेतील जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळा केल्या प्रकरणी (Jumbo Covid Centre Scam) सुजीत पाटकर यांच्या विरोधात तक्रर केली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात (Azad Maidan Police Station) किरिट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे.

 

खोटे कागदपत्र दाखवून मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) कंत्राट मिळवल्याचा आरोप पाटकर यांच्यावर करण्यात आला आहे.
पाटकर हे संजय राऊत यांचे जवळचे मित्र आहेत.
त्यांना हे कंत्राट राऊत यांच्या सांगण्यावरुन मिळाल्याचा आणि राऊत हे पाटकर यांचे पाटर्नर असल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला होता.

 

दरम्यान सोमय्या यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख (Congress Leader Aslam Sheikh) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे.
मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी (Studio Scam Case) शेख अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कारण या अनधिकृत स्टुडिओची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.
सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे.
या स्टुडिओच्या बांधकामाला महाविकास आघाडीकडून फेब्रुवारी 2021 मध्ये मान्यता मिळाली होती

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Jumbo Covid Centre Scam | BJP leader kirit somaiya filed a police complaint against shivsena leader and mp sanjay rauts friend sujit patkar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बहिणीच्या मुलाने मुलीला पळवून नेल्याच्या रागात महिला व मुलीला पळवून नेऊन केला बलात्कार करण्याचा प्रयत्न

Maharashtra Monsoon Session | आमदार महेश शिंदेंनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली – अमोल मिटकरी

Pune Crime | जीवे ठार मारण्याची धमकी ! 10 लाखांची खंडणी मागणार्‍या दोघा सावकारांना खंडणी विरोधी पथक-2 कडून अटक

 

Related Posts