IMPIMP

Pune Crime | जीवे ठार मारण्याची धमकी ! 10 लाखांची खंडणी मागणार्‍या दोघा सावकारांना खंडणी विरोधी पथक-2 कडून अटक

by nagesh
Pune Crime | Koregaon police arrested the maid who stole silver gods and ornaments

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आर्थिक अडचणीच्या वेळी व्याजाने घेतलेले पैसे परत दिले असतानाही आणखी १० लाख रुपयांची मागणी करुन मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोघा सावकारांना (Money Lenders In Pune) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pune) अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राहुल बाळकृष्ण कोंढरे Rahul Balkrishna Kondhre (वय ४२, रा. बबन स्मृती, दत्तनगर रोड, आंबेगाव बुद्रुक) आणि विजय गणपत कुंभारकर Vijay Ganpat Kumbharkar (वय ३८, रा. धायरी फाटा) अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका ३३ वर्षाच्या नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४९/२२) दिली आहे. हा प्रकार १ जून २०१९ ते २३ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आर्थिक अडचण असल्याने त्यांनी राहुल कोंढरे याच्याकडून १० टक्के प्रति महा व्याजाने ५ लाख रुपये घेतले. विजय कुंभारकर याच्याकडून ८ टक्के दराने ५ लाख रुपये घेतले होते. फिर्यादी यांनी कोंढरे याला ४ लाख ८० हजार रुपये व मुद्दल २ लाख रुपये दिले तसेच विजय कुंभारकर याला दरमहा ४० हजार रुपये प्रमाणे व्याज ५ लाख तसेच व्याज म्हणून १ लाख ५७ रुपयांचे स्टील व मुद्दल ३ लाख रुपये दिले असे असतानाही दोघेही त्यांच्याकडे अजून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मागणी करत होते. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर ते फिर्यादीच्या घरी गेले व त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdrv Sajgane),
पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav), पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, सैदाबा भोजराव, संग्राम शिनगारे, अमोल पिलाने, प्रदिप गाडे, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, रवि संकपाळ, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Anti Extortion Cell Arrested Two Money Lenders

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Session | विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा, आमदार एकमेकांच्या अंगावर धावले, धक्काबुक्कीही झाली

Pune PMC Recruitment 2022 | पुणे महापालिका मेगाभरती ! अर्जांमध्ये त्रुटी आढळलेल्या ‘त्या’ 300 उमेदवारांनाही संधी दिली जाणार

Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा झाला बदल, जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts