IMPIMP

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

by pranjalishirish
kamini-patil-as-the-house-leader-of-bhiwandi-municipal-corporation

भिवंडी : भिंवडी येथे भाजप पक्षात असलेली अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. भिवंडी शहर महानगरपालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीत दीड वर्षापूर्वी कोनार्क विकास आघाडीस पाठिंबा देणाऱ्या भाजप पक्षाला महापौरांनी जोरदार दुसरा धक्का दिला आहे. महासभेत भाजपाचे सभागृह नेते श्याम अग्रवाल यांचे पद काढून घेत सभागृहनेतेपदी भाजपच्या नगरसेविका कामिनी रवींद्र पाटील  Kamini Patil यांची करण्यात आली आहे.

 

अचानक महापौरांनी सभागृह नेते पदावर विराजमान असलेले ज्येष्ठ नगरसेवक श्याम अग्रवाल यांची उचलबांगडी करीत सभागृहात नेतेपदी नगरसेविका कामिनी रविंद्र पाटील Kamini Patil  यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सभागृहात नेते अग्रवाल यांना जोरदार झटका बसला आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी भाजपचे विरोधी पक्ष पद काढून घेत काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले मतलुब सरदार खान यांना विरोधी पक्षनेते पद देऊन भाजपला झटका दिला आहे.

 

शासनाच्या आदेशानुसार भिवंडी शहर महानगरपालिकेत आँनलाईन सर्वसाधारण महासभेचे आयोजन महापौर प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
नवीन नाट्यगृह वऱ्हाळा तलाव परिसरात बांधण्याच्या विषयांबरोबरच अन्य विषय देखील महासभेत मंजूर केले आहेत.
ज्यात कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्या संदर्भातील विषय देखील महासभेत पास झाला आहे.
त्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

Also Read :
‘सचिन वाझेंची तात्काळ नार्को टेस्ट करा, खरा चेहरा समोर येईल’ – राम कदम

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता ‘ही’ मोठी जबाबदारी

NIA चा मोठा खुलासा ! स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणात दहशतवादी संघटनांचा संबंध नाही !

Related Posts