IMPIMP

सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

by bali123
sachin vaze arrested bjp aggressive after sachin vazes arrest sharad pawar also gave first reaction

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याच्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे sachin vaze यांची एनआयएकडून 13 तास चौकशी करण्यात आली. चौकशीअंती सचिन वाझे sachin vaze यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, ,473, 506९2०, 120 बी आणि 4 (ए) (बी) (आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली.

सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांची देखील याप्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एक व्यावसायिकचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी सचिन वाझे यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पहात आहे ? सचिन वाझे यांची नार्कोटेस्ट झाली तर शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल, असे राम कदम यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रकरणात चौकशीत जे काही सत्य बाहेर येईल, जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेवर बोलणं टाळलं आहे. प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना सचिन वाझे यांच्या अटकेवर विचारणा केली असता, तो स्थानिक विषय आहे. मी जास्त भाष्य करणार नसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

अँटेलिया केस : NIA ची अ‍ॅक्शन ! ‘या’ कलमान्वये पोलिस अधिकारी सचिन वाझेंविरूध्द गुन्हा, जाणून घ्या

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

Related Posts