IMPIMP

Kartik Purnima | केव्हा आहे कार्तिक पोर्णिमा? जाणून घ्या स्नान करण्याचा शुभ मुहूर्त आणि पूजन विधी

by nagesh
Kartik Purnima | When is Kartik Pournima? Learn the auspicious moment of bathing and the ritual of worship

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Kartik Purnima | विष्णु पुराणानुसार कार्तिक पोर्णिमेच्या (Kartik Purnima) संध्याकाळी भगवान विष्णुंचा मस्त्यावतार झाला होता. दुसर्‍या एका मान्यतेनुसार, कार्तिक पोर्णिमेच्या दिवशीच महादेवांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, यासाठी तिला त्रिपुरी पौर्णिमा (tripura purnima) म्हटले जाते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या पावन दिनी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दीपदान करण्याची सुद्धा परंपरा आहे. कार्तिक पौर्णिमेच्या (Kartik Purnima) दिवशी विशेष प्रकारे लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी करण्यात येणार्‍या दान-पुण्यासह अनेक धार्मिककार्य विशेष फलदायी असतात.

 

कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षातील पोर्णिमेला कार्तिक पौर्णिमा म्हणतात. यावर्षी 19 नोव्हेंबर 2021 रोजी शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima) आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी एखादी पवित्र नदी, तलाव किंवा कुंडात स्नान करणे अतिशय शुभ मानले जाते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

स्नानानंतर दीपदानासह भगवान श्रीकृष्ण आणि राधेची पूजा करण्याचा रिवाज आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी करण्यात आलेल्या दानातून पुण्यफळ सुद्धा दुप्पट मिळते.

 

कार्तिक पौर्णिमेच्या (Kartik Purnima) दिवशी, गाय, हात्ती, घोडा, रथ आणि तूपाचे दान केल्याने संपत्ती वाढते.
तर मेंढ्यांचे दान केल्याने ग्रहयोगाचा त्रास दूर होतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी उपवास करणार्‍यांनी हवन आवश्य करावे,
यासोबतच जर उपवास करणार्‍यांनी गरजूंना भोजन दिले तर त्यांना जास्त लाभ मिळतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

कार्तिक पौर्णिमेचा शुभ मुहूर्त

यावर्षी कार्तिक पौर्णिमेची तिथी 19 नोव्हेंबरला आहे.
पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 18 नोव्हेंबरला रात्री 12 वाजून 02 मिनिटांनी सुरू होऊन 19 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजून 29 मिनिटांपर्यंत समाप्त होईल.
या दिवशी प्रत्येक व्यक्तीने स्नान आवश्य करावे आणि काही काळ देवभक्तीसाठी द्यावा.

 

Web Title :- Kartik Purnima | When is Kartik Pournima? Learn the auspicious moment of bathing and the ritual of worship

 

हे देखील वाचा :

POCSO Act अंतर्गत गुन्ह्यासाठी ’स्किन टू स्किन’ संपर्कच आवश्यक नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून हायकोर्टाचा निर्णय रद्द

Life Certificate | केवळ 13 शिल्लक ! पेन्शनर्सने लवकर जमा करावा आपला हयातीचा दाखला, अन्यथा होईल नुकसान

IND Vs NZ | विराट कोहली अन् रवी शास्त्रीच्या काळात करिअर संपलेल्या ‘या’ खेळाडूला रोहितनं दिली संधी; क्रिकेटर मिळालेल्या चान्सचं सोनं करणार?

 

Related Posts