IMPIMP

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांची ‘ती’ पत्रं ठेवली समोर

by nagesh
Kirit Somaiya | pre arrest bail application of kirit somaiya rejected

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कोर्लई गावात (Korlai Village) असलेल्या जमिनीवरील कथित बंगल्यावरुन किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. सोमय्या आणि शिवसेना यांच्या आरोप – प्रत्यारोपांचा नवा अंक आज (सोमवार) पहायला मिळाला. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात (BJP Headquarter Mumbai) पत्रकार परिषद घेऊन रश्मी ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायतीला दिलेले पत्र प्रसारमाध्यामांसमोर ठेवले. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या भ्रष्टाचाराविरोधी लढ्याचे कौतुक करणारे पत्रही त्यांनी दाखवले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019 मध्ये कोर्लई ग्रामपंचायतीला (Korlai Gram Panchayat) पत्र लिहले होते. या पत्रात त्यांनी 30 एप्रिल 2014 मध्ये अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्याकडून जमीन खरेदी केल्याचे म्हटले आहे. जमीन खरेदी करताना त्यावर बंगले नव्हते, असे रश्मी ठाकरे यांनीच म्हटले आहे. मग प्रतिज्ञापत्रात 5 कोटींची मालमत्ता असल्याचे दाखवून बनावट माहिती कोणी दिली असा सवाल किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उपस्थित केला आहे.

 

महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेची फसवणूक कोणी केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारची फसवणूक (Cheating) कशी केली ? मी हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर चौकशी सुरु झाली.
त्यानंतर गेल्या 17 महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकदाही यावर स्पष्टीकरण का दिले नाही. उद्धव ठाकरे यांच्यात बोलण्याची हिंमत नाही का ? रश्मी ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना पत्र लिहूच शकत नाहीत. मग उद्धव ठाकरे स्वत:च्या पत्नीची बाजू का घेत नाहीत, असाही सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.

 

या सर्व प्रकरणात दोन शक्यता आहेत. एकतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपत्तीचे मूल्य वाढवण्यासाठी प्रतिज्ञापत्रात (Affidavit) चुकीची माहिती दिली.
जेणेकरुन ही जमीन दुसऱ्याला विकताना त्याचा जास्त भाव मिळाला असता.
अथवा याठिकाणी एखादे रिसॉर्ट (Resort) उभारण्याचा त्यांचा प्लॅन होता.
दुसरी शक्यता म्हणजे उद्धव ठाकरे यांनी एका रात्रीत 19 बंगले गायब केले असावेत, असे सोमय्यांनी सांगितले.
अन्वय नाईक यांनी तरी उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली असावी, अशी शक्यताही सोमय्या यांनी व्यक्त केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संजय राऊतांचे सोमय्यांना पत्र
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांना 11 ऑक्टोबर 2021 ला पत्र लिहिलं होतं.
या पत्रात संजय राऊत यांनी म्हटले होते की, प्रिय किरीट सोमय्याजी तुम्ही आजवर भ्रष्टाचार (Corruption), शासकीय पैशांचा अपहाराची अनेक प्रकरणे सार्वजनिकरित्या उघड केली आहेत.
हे महाराष्ट्रावर उपकारच झाले. तुम्ही बाहेर काढलेल्या गैरव्यवहारांमुळे अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागेल, असा काहीसा मजकूर पत्रात असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.

 

Web Title :- Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya slams rashmi thackeray and sanjay raut over 19 bunglow

 

हे देखील वाचा :

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिका : बहुचर्चित मुळा-मुठा नदी सुधार योजनेच्या निविदांना मान्यता

Pune Crime | पुण्यात सैराटची पुनरावृत्ती ! प्रेमविवाह केल्याने बहिणीच्या पतीवर कोयत्याने सपासप वार

Corona Vaccines | कोरोना लसींची मुदत संपणार असल्याने 50 हजाराहून अधिक लस वाया जाण्याची भीती

Corporator Avinash Ramesh Bagwe | नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांच्या निधीतून प्रभाग 19 मधील ‘संत संताजी महाराज जगनाडे उद्याना’चे भूमिपूजन

 

Related Posts