IMPIMP

Kirit Somaiya | ‘उद्या हे लोक सोनिया गांधींचे चरणस्पर्श देखील करतील’ – किरीट सोमय्या

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiyas serious allegations against uddhav thackeray

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वि. दा. सावरकरांचे (V. D. Savarkar) माफिनामे बाहेर काढले. त्यामुळे राज्यातील भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मात्र आम्ही राहुल गांधींच्या मताशी सहमत नाही, असे म्हंटले आहे. त्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज असे बोलणार आणि उद्या राहुल गांधींच्या मागे जाऊन सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांचे चरणस्पर्श करणार, असे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे सांगितले. तसेच राहुल गांधी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत सावरकरांचा विषय काढण्याची गरज नव्हती, असे दोघांचे मत आहे. त्यावर बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे नाटक करत आहेत. ते लोकांशी खोटे बोलत आहेत. त्यांनी हातात घेतलेले हिरवा झेंडा खाली ठेवण्याची त्यांच्यात हिंमत नाही. आज ते असे बोलत आहेत. उद्या राहुल गांधी यांच्या मागे जाऊन सोनिया गांधींचे चरणस्पर्श देखील करतील.

 

राहुल गांधी यांची आज शेगावमध्ये सभा होणार आहे. त्यासाठी विदर्भातून अनेक लोक येण्याची शक्यता आहे.
तसेच दुसरीकडे मनसे (MNS) देखील राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे.
मनसेने राहुल गांधी यांना विरोध करण्यासाठी त्यांच्या सभेत जाण्याची तयारी केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांना शेगावला जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजची शेगाव सभा गाजणार आहे. काँग्रेसने देखील आमची सभा आणि यात्रा थांबवून दाखवा, असे आव्हान मनसे आणि भाजपला केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kirit Somaiya | savarkar controversy kirit somaiyas criticism of uddhav thackeray sanjay raut

 

हे देखील वाचा :

Sinhagad Fort | 10 दिवसात दुसऱ्या किल्ल्याला अतिक्रमणाच्या बंधनातून सोडवले; संग्रामगड पाठोपाठ सिंहगडही अतिक्रमण मुक्त

Maharashtra Politics | महाविकास आघाडीच्या फुटीच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या जयराम रमेशांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, पण…”

Pune Pimpri Crime | ट्रेडिंग कंपनीची बनावट वेबसाईट तयार करुन घातला 27 लाखांचा गंडा; वाकड मधील घटना

 

Related Posts