IMPIMP

Pune Pimpri Crime | ट्रेडिंग कंपनीची बनावट वेबसाईट तयार करुन घातला 27 लाखांचा गंडा; वाकड मधील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ट्रेडिंग कंपनी (Trading Company) बनावट वेबसाईट (संकेतस्थळ) तयार करुन त्याच्या माध्यामातून ऑनलाइन ट्रेडिंग केल्यास जास्त फायदा होतो सांगत, वाकड भागातील एका तरुणाला 26 लाख 91 हजार रुपयांचा गंडा घातल्याला प्रकार (Pune Pimpri Crime) उघड झाला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) अज्ञात तिघांच्यावरोधात फसवणूक (Fraud) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत (IT Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तीन आरोपी आणि या गुन्ह्यात (Pune Pimpri Crime) सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हा प्रकार एप्रिल 2022 पासून सुरु होता. याबाबत विश्वनाथ मोहन गोसावी Vishwanath Mohan Gosavi (वय 72, रा. रहाटणी, पिंपरी चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा अजित गोसावी याला सूरज, जयदीप आणि प्रतिक नावाच्या तिघांनी वेळोवेळी वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन करुन तुम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यामातून ऑनलाइन ट्रेडिंग करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल, असे सांगितले. 7047325915, 8710046005, 7430972280, 7047326015, 8710041508, 8670266423 या क्रमांकावरुन फिर्यांदी यांच्या मुलाला फोन आले होते. आरोपींनी http://www.autofxtrade.asia (Auto FX Trade) या नावाची बनावट ट्रेडींग वेबसाईट तयार करुन अजय याला ट्रेडिंग खाते उघडण्यास भाग पाडले. (Pune Pimpri Crime)

 

त्यानंतर आरोपींनी ए. यु. स्मॉल फायनान्स बँक (A U Small Finance Bank) खाते देखील उघडण्यास सांगितले.
या खात्यात जास्त फायद्याचे आमिष दाखवून 16.91 लाख रुपये गुंतविण्यास सांगितले.
तसेच त्याला बनावट आयडीवर 532547.80 यु.एस. डॉलरचा (चार कोटी) फायदा झाल्याचे दाखविले.
त्यानंतर आरोपींनी अजित याच्याकडून दहा लाख रोख मागितले.
त्यानुसार अजित याने 9099942837 या मोबाईल क्रमांकाच्या धारकास पैसे दिले.
मात्र आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला पैसे न देता पैशांचा अपहार केला.
आपली ऑनलाइन फसवणूक केल्याचे लक्षात येताच, मुलाने याची माहिती वडिलांना दिली. त्यानुसार त्यांनी पोलिसांत धाव घेत आरोपींविरुद्ध तक्रार केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | 27 lakhs of fraud by creating a fake website of a trading company; Incidents in Wakad

 

हे देखील वाचा :

Ahmednagar Crime | अहमदनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना; अनाथ तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत ५ जणांनी केला बलात्कार

Pune Pimpri Crime | भोसरीत टोळक्याकडून दुकानांची तोडफोड, एकाला अटक

Mithila Palkar | मिथिला पालकर तिच्या ड्रेसमुळे चर्चेत; नेटकऱ्यांनी पायपुसणी म्हणत केले ट्रोल

 

Related Posts