IMPIMP

Kisan Credit Card | SBI कडून बनवा किसान क्रेडिट कार्ड, घेऊ शकता 3 लाखापर्यंत कर्ज; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

by nagesh
Kisan Credit Card Loan Scheme | farmers will get credit cards from the central government for crop loans

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाKisan Credit Card | केंद्र सरकारने 1998 मध्ये शेतकर्‍यांसाठी किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card (KCC) योजना सुरू केली होती, जेणेकरून शेतकर्‍यांना अधुनिक शेतीच्या संधीसाठी आवश्यक पैसा मिळावा. या अंतर्गत शेतकर्‍याना कमी व्याजदारावर कर्ज दिले जाते. ईएमआय (EMI) सुद्धा कमी असतो. या कार्डद्वारे शेतकरी तीन लाखापर्यंत कर्ज 4 टक्के व्याजदराने घेऊ शकतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

कोण करू शकतात अर्ज

शेतकरी, मत्स्यपालन आणि पशुपालन करणार्‍या सर्व व्यक्ती, इतरांच्या जमीनीत शेती करत असणारे, लाभ घेऊ शकतात. किमान वय 18 आणि कमाल 75 वर्ष असावे. शेतकर्‍याचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर एक को-अ‍ॅपलीकंट सुद्धा लागेल. ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे. शेतकर्‍याने फॉर्म भरल्यानंतर बँक कर्मचारी पाहिल की, तुम्ही पात्र आहात की नाही.

एसबीआयकडून (SBI) असे बनवू शकता केसीसी

तुमचे खाते एसबीआय बँकेत असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी केवळ योनोचा वापर करावा लागेल. YONO agriculture platform! वर जाऊन किसान क्रेडिट कार्डसाठी (Kisan Credit Card) अर्ज करू शकता. यासंदर्भातील पूर्ण प्रक्रिया जाणून घेवूयात…

एसबीआय योनो अ‍ॅप डाऊनलोड करा.

किंवा https://www.sbiyono.sbi/index.html वेबसाइटवर लॉग इन करू शकता.

येथे योनो कृषी ऑपशन दिसेल. तिथे जा.

यानंतर ‘खाते’ ऑपशन सिलेक्ट करा.

येथे केसीसी पुनरावलोकन विभागात जा.

अर्जावर क्लिक करा. समोर उघडलेल्या विंडोत पूर्ण प्रक्रिया भरा. हे केल्यानंतर अर्ज पूर्ण होईल.

 

Web Title : Kisan Credit Card | kisan credit card wants to be made from sbi you can take loan up to three lakhs know complete process

 

हे देखील वाचा :

Covid Vaccination Certificate | लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाच्या सांगण्यावरुन PM मोदींचा फोटो? जाणून घ्या RTI मधून मिळालेलं उत्तर

Mahadev Jankar | ‘गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही’

WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट आता राहील सुरक्षित, असे ऑन करू शकता एंड-टू-एंड इनक्रिप्शन फीचर

 

Related Posts