IMPIMP

Kishori Pednekar | आज भाऊबीजेला माझ्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत, किशोरी पेडणेकराचे शिंदे गटावर टीकास्त्र

by nagesh
Kishori Pednekar | I have a smile in one eye and tears in the other, Kishori Pednekar's criticism of the Shinde group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी हनुमान मंदिरात भाऊबीज (Bhaubeej) साजरी केली. यावेळी त्या माध्यामांसोबत बोलत होत्या. यावेळी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी विविध मुद्यांवर भाष्य करताना राज्य सरकारवर (State Government) टीका देखील केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे माझ्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यावेळी माझ्या लग्नाला माझे सख्खे चुलत भाऊ कोणीही माझ्या लग्नाला आले नाहीत. त्यावेळी आमच्या चाळीसमोर हनुमानाचे मंदिर होते. मग लग्नानंतरच्या पहिल्या रक्षाबंधनाला मी हनुमंताला राखी बांधली. मी हनुमानाला भाऊ मानला. आणि तेव्हापासून मी प्रत्येक रक्षाबंधन आणि भाऊबीज सणाला हनुमानालाच भाऊ म्हणून ओवाळीत आले आहे. आणि आज देखील मी हनुमान मंदिरात जाऊन भाऊबीज साजरी केली. आता लोक हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणत फिरत आहेत. त्यांची दशा अशी आहे की, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना टोला लावला.

 

शिवसेनेतून आमचे चाळीस भाऊ आम्हाला सोडून गेले. त्यांना देखील मी शुभेच्छा नक्की देईन. कारण, आपल्याकडे एक अख्यायिका आहे. यमुना आणि यम ही दोघे भावंडे होती. यमुना यमाला अनेकदा बोलवत होती. पण यम जात नव्हता. आणि ज्या दिवशी यम गेले, तेव्हा यमुनेने त्यांचे अवक्षण केले. आणि त्यांनी भाऊबीज केली. त्या दिवसापासून भाऊबीज रुढ झाली, अशी भाऊबीजेची अख्यायिका आहे. त्यामुळे आमचे चाळीस भाऊ जरी आम्हाला सोडून गेले असले, तरी त्यांना मी आरोग्यदायी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देते. त्यांनी आता तरुणांना राजकारणात घेऊन यावे आणि तरुण पिढीला राजकारणात लोकोपयोगी कामे शिकवावीत, असे किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यावेळी म्हणाल्या.

 

तसेच आज माझ्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्या अश्रू आहेत.
एका डोळ्यात अश्रू आहेत कारण, आमचा विश्वासघात केला आणि आमच्यासोबत त्यांनी गद्दारी केली,
असे देखील पेडणेकर म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फटाके वाजवून प्रदूषण होते. त्यामुळे मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) काळात पर्यावरण मंत्री
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रदूषण आटोक्यात आणले होते.
पण आता त्यांचे सरकार गेल्याने लोक फटाके फोडून प्रदूषण वाढवत आहेत.
फटाके फोडा पण त्या फटाक्यांचा आणि धूराचा लोकांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्या.
उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. त्यांनी जरुर करावेत.
पण त्यासाठी त्यांनी ढोल पिटू नयेत. ते त्यांचे काम आहे, असेही पेडणेकर यांनी म्हटले.

 

Web Title :- Kishori Pednekar | I have a smile in one eye and tears in the other, Kishori Pednekar’s criticism of the Shinde group

 

हे देखील वाचा :

Carrot Juice Benefits | हिवाळ्यात गाजर ज्यूसने करा दिवसाची सुरूवात, जाणून याचे 4 जबरदस्त फायदे

Maharashtra Politics | दिवा विझताना तेजोमय होतोच; भाजप-मनसे-शिंदे गटाच्या संभाव्य महायुतीला शिवसेनेचा टोला

Devendra Fadnavis | आगामी महापालिका निवडणुक भाजप-शिंदे गट युतीकरुन लढवणार?, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

CM Eknath Shinde Ayodhya Visit | जय श्रीराम! CM एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार

 

Related Posts