IMPIMP

CM Eknath Shinde Ayodhya Visit | जय श्रीराम! CM एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार

by nagesh
CM Eknath Shinde Ayodhya Visit | cm eknath shinde with mla and minister likely to visit ayodhya ram mandir after diwali in november

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – CM Eknath Shinde Ayodhya Visit | महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi Government) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आयोध्येला गेले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सुद्धा आपल्या सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला (Ayodhya Visit) जाणार आहेत. या दौर्‍याचे नियोजन लवकरच केले जाणार असून, नोव्हेंबर महिन्यात शिंदे गट अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊ शकतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज (Hanuman Garhi Chief Mahant Rajudas Maharaj) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला (Ayodhya Visit) येण्याचे आमंत्रण दिले होते. हे निमंत्रण शिंदे यांनी स्वीकारले होते. त्यामुळे शिंदे हे आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार आहेत.

 

अयोध्या दौर्‍याची तारीख अद्याप ठरलेली नाही. या दौर्‍यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे (Shinde Group) सर्व मंत्री आणि आमदारही अयोध्येला जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात शिंदे गट अयोध्येत जाणार आहे. तिथे रामलल्लाचे दर्शन घेणार आहे. यावेळी शिंदे गट शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

 

आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal Elections) हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडण्याची शिंदे गटाची
रणनीती असल्याचे जाणवत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे
हिंदुत्व (Hindutva) आपण पुढे घेऊन जात आहोत हे निवडणुकीपूर्वी दर्शवण्यासाठी शिंदे गट अयोध्येला निघाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊन साडेतीन महिने होऊन गेले. शिवाय कोरोनाचे संकटही ओसरलेले आहे.
असे असताना शिंदे अजून अयोध्येला गेलेले नाहीत. म्हणून शिंदे हे अयोध्येला जाण्याची घाई करत आहेत.

 

 

Web Title :-  CM Eknath Shinde Ayodhya Visit | cm eknath shinde with mla and minister likely to visit ayodhya ram mandir after diwali in november

 

हे देखील वाचा :

T20 World Cup | Virat Kohli ने ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्त व्हावे; Shoaib Akhtar ने मांडले मत, सांगितले हे कारण

Pune Crime | कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यु, होळकर पुलावरील घटना

Pune Crime | भांडारकर रोडवर रिक्षाचालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले

 

Related Posts