IMPIMP

Devendra Fadnavis | आगामी महापालिका निवडणुक भाजप-शिंदे गट युतीकरुन लढवणार?, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

by nagesh
Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis announced to investigate case of bogus recruitment in the ministry

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन आगामी महानगरपालिका निवडणुका (Municipal Elections) प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे त्या कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुकांची रणधुमाळी होईल, असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

न्यायालयात खटला सुरु आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुका होतील. तसेच न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुका कधी घ्यायच्या हा सर्वस्वी अधिकार आणि निर्णय निवडणूक आयोगाचा (Election Commission of India) आहे. निवडणूक आयोगाने जे वेळापत्रक जारी केले होते. त्यावर न्यायालयात केस सुरु आहे. त्यामुळे त्याच्या निकालानंतर निवडणुका होतील. बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) युतीबाबत देखील उपमुख्यमंत्री बोलले. काही ठिकाणी आम्ही सोबत निवडणुका लढविणार आहोत, तर काही ठिकाणी आम्ही वेगवेगळे निवडणूक लढविणार आहोत, असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

तसेच निवडणूक आयोगाला चिन्ह रद्द करण्याचा आणि नवीन चिन्ह देण्याचा पूर्ण अधिकार आहे.
त्यामुळे कोणाच्या तक्रारी किती आहेत आणि कोणाच्या तक्रारींवर निर्णय होणार हे निवडणूक आयोग ठरवेल. तसेच विरोधी पक्ष हा मुद्दा स्वत:च्या समाधानासाठी उकरुन काढत आहे, असे देखील फडणवीस म्हणाले.

 

आगामी महापालिका आणि इतर निवडणुकांबाबात राजकीय पक्ष आणि जनतेला उत्सुक्ता आहे.
शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) झाल्यानंतर निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार,
यावर बंडखोर आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे भवितव्य ठरणार आहे.
त्यामुळे सर्वच जण तयारीला लागले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | Will the BJP-Shinde group fight the upcoming municipal elections as an alliance?, Devendra Fadnavis clearly said…

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde Ayodhya Visit | जय श्रीराम! CM एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार

T20 World Cup | Virat Kohli ने ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्त व्हावे; Shoaib Akhtar ने मांडले मत, सांगितले हे कारण

Pune Crime | कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यु, होळकर पुलावरील घटना

Pune Crime | भांडारकर रोडवर रिक्षाचालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले

 

Related Posts