IMPIMP

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकर यांचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला; म्हणाल्या – ‘तुम्ही सोडून गेलात हाच मोठा गौप्यस्फोट, आता…’

by nagesh
Kishori Pednekar | shivsena leader and bmc former mayor kishori pednekar slams chief minister eknath shinde and bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याने शिवेसेनेची (Shivsena) डोकेदुखी वाढली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) हे पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे राज्यात दौरे करत आहेत. असे असले तरी शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात (Shinde Group) सहभागी होत आहेत. अशातच मुंबईच्या माजी महापौर (Mumbai Former Mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या घरी गणरायाचे आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आता आणखी काय स्फोट करणार
किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या, एकनाथ शिंदे सोडून गेले, हाच मोठा गौप्यस्फोट आहे. आता आणखी काय स्फोट करणार आहेत, काय बोलायचं ते बोलू देत, अंस पेडणेकर यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेनेच्या मागे लागलेलं शुक्लाकाष्ट संपू दे, त्याचा लवकरात लवकर निकाल लागावा असेही त्या म्हणाल्या. त्यांच्याकडे शिवसेनेचे उपनेतेपद देण्यात आले. यावर बोलताना त्या म्हणाल्या मी शिवसेना पक्षावर दाखवलेल्या निष्ठेचे हे फळ आहे.

 

तुमच्या जाण्यानेच मोठा…
तुमच्या जाण्यानेच मोठा गौप्यस्फोट झाला. यापेक्षा अजून काय स्फोट करणार.. भाजपला (BJP) जे पाहिजे, ते देण्याची कृपा करु नका. काय बोलायचे ते बोलू देत. मग जनता ठरवेल, स्फोट आहे की आणखी काही आहे…, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर देताना पेडणेकर म्हणाल्या. तसेच निष्ठेने काम करताना फळ मिळतं त्यामुळेच माझी उपनेते पदी निवड झाल्याचे त्यांनी म्हटले.

 

लवकरात लवकर निकाल लागावा
हे जे काही शुक्लाकाष्टक शिवसेनेच्या मागे लागले आहे, त्याचा लवकरात लवकर निकाल लागावा.
जनतेच्या मनातही धाकधूक, राग, द्वेष आहे, तो संपू देत. दोन वर्षांनी मोकळा श्वास घेत आहेत.
आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा आहे. सगळं देणारा हा देव आहे.
सर्वांचे भल, कल्याण कर अशी प्रार्थना मी करते, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kishori Pednekar | shivsena leader and bmc former mayor kishori pednekar slams chief minister eknath shinde and bjp

 

हे देखील वाचा :

MBBS Student Suicide | सुट्टीसंपवून कॉलेजला आला अन् हॉस्टेलवर गळफास घेऊन केली आत्महत्या

Pune ACB Trap | 2 हजाराची लाच घेताना पुण्यातील पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

BJP-MNS Alliance | ‘भाजप-मनसेला युती करण्याची गरज नाही, कारण…’, शिवसेना नेत्याचा मोठा दावा; राजकीय चर्चांना उधाण

 

Related Posts