IMPIMP

Kolhapur North By Election | अखेर कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

by nagesh
CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray has called a meeting of shiv sena office bearers and ordered them to start party building work

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइनKolhapur North By Election | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ अखेर काँग्रेसला (Congress) सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) अंतर्गत घेण्यात आला आहे. शिवसेनेने (Shivsena) माघार घेतल्याने या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असेल. त्यामुळे आता काँग्रेस विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगणार आहे. बालेकिल्ला असल्याने शिवसेनेने या ठिकाणी काँग्रेससह मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह धरला होता. बैठकींच्या फेर्यानंतर अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला (Kolhapur North By Election) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा भाजपला फायदा होतो का हे निकालानंतरच समजेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी सध्या पोटनिवडणूक (Kolhapur North By Election) जाहीर झाली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Congress MLA Chandrakant Jadhav) यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तरची जागा रिकामी झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास कालपासून (दि. 17) सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत 24 मार्च आहे. मतदान 12 एप्रिल रोजी होणार असून 16 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) आहे. परिणामी काँग्रेसच्या आमदाराचे निधन झाल्याने हा मतदारसंघ काँग्रेसकडेच रहावा यासाठी पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister Satej Patil), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) आग्रही होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) हे हा मतदारसंघ बालेकिल्ला असल्याने शिवसेनेला मिळावा यासाठी प्रयत्नशिल होते. तसेच राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार (District Chief Sanjay Pawar), विजय देवणे, मुरलीधर जाधव आदींनी काँग्रेसला जागा सोडली तरी शिवसेनेचा मतदार काँग्रेसला मतदान करेल का ? शिवसेनेच्या मतदानाचा फायदा भाजपला होईल, अशी भिती व्यक्त करत होते. त्यामुळेच मैत्रीपूर्ण लढून कोल्हापूर उत्तर मतदारसंघ महाविकास आघाडीकडेच ठेवू , अशी शिवसेनेची मागणी होती.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून अपवाद वगळता शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.
1995 व 1999 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेश साळोखे (Suresh Salokhe) हे विजयी झाले होते.
2004 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडून काँग्रेसच्या ताब्यात गेला. काँग्रेसचे मालोजीराजे (Maloji Raje) यांनी साळोखे यांचा पराभव केला.
2009 मध्ये राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा पराभव करुन हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आणला.
यानंतर 2014 मध्येही शिवसेनेने या मतदारसंघावर भगवा फडकवला. 2019 च्या निवडणुकीत चंद्रकांत देशमुख यांनी क्षीरसागर यांची हॅट्रीक रोखली.
मात्र पराभवानंतरही मुख्यमंत्री ठाकरे यांनी क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले राज्य नियोजन मंडळाचे (State Planning Board) कार्यकारी अध्यक्षपद दिले.
मागील दोन वर्षात क्षीरसागर यांनी विविध विकास कामे केली आहेत.
त्यामुळे शिवसेनेने या मतदारसंघावर हक्क सांगितला होता. मात्र, आता ही जागा काँग्रेसला सोडल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Kolhapur North By Election | kolhapur north vidhan sabha constituency for congress CM uddhav thackeray decision

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात शरद पवारांचे महत्त्वाचं विधान, म्हणाले…

Reduce Risk Of Heart Attack | ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करतील ‘ही’ 5 फळे, उन्हाळ्यात डाएटमध्ये करा समावेश

Nawab Malik | नवाब मलिक झाले ‘बिनखात्याचे मंत्री’ ! मलिकांकडे असलेल्या खात्यांचा आणि इतर पदभार ‘या’ 6 दिग्गजांकडे सुपूर्द

 

Related Posts