IMPIMP

Kotak Mahindra Bank Stock | कोटक महिंद्रा बँकेने 20 वर्षात बनवले करोडपती, अवघे 20 हजार रुपये झाले सुमारे 2 कोटी

by nagesh
Kotak Mahindra Bank Stock | kotak mahindra bank made crorepati in 20 years only rs 20000 have been made about rs 2 crores

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Kotak Mahindra Bank Stock | कोटक महिंद्रा बँकेच्या स्टॉक (Kotak Mahindra Bank stock) ने 20 वर्षात गुंतवणुकदारांच्या 20 रुपयांचे सुमारे 2 कोटी रुपये बनवले आहेत. कोटक महिंद्रा बँक देशातील टॉप टेन मार्केट कॅप कंपन्यां (top ten market cap companies) पैकी एक आहे, परंतु या बँकेने मागील 20 वर्षात मोठा पल्ला गाठला आहे. या वाटचालीचे पूर्ण कॅलक्युलेशन जाणून घेवूयात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

20 वर्षात सुमारे 968 पट रिटर्न
20 वर्षापूर्वी 8 ऑक्टोबरला बँकेचा शेयर 2 रुपये होता. तर शुक्रवारी जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा कोटक बँकेची शेयर प्राईस 1935.70 रुपयांवर बंद झाली होती. याचा अर्थ असा आहे की, या दरम्यान शेयरने 968 पटीत रिटर्न दिला आहे. म्हणजेच गुंतवणुकदारांना 96685 टक्केचा रिटर्न मिळाला आहे. (Kotak Mahindra Bank Stock)

मागील 10 वर्षात किती दिला रिटर्न
मागील एक महिन्यात बँकेच्या शेयरने 1817.90 रुपयांच्या हिशेबाने सुमारे 6.48 टक्केचा रिटर्न दिला आहे. एक वर्षात बँकेच्या शेयरने गुंतवणुकदारांना सुमारे 50 टक्के रिटर्न दिला आहे. आकड्यांनुसार, मागील पाच वर्षात कोटक बँकेच्या शेयरमध्ये 150 टक्के रिटर्न मिळाला आहे. तर 10 वर्षात 750 टक्के रिटर्न दिला आहे.

20 वर्षात 20 हजार झाले 2 कोटी
जर एखाद्या गुंतवणुकदाराने 2 रुपयांच्या हिशोबाने 20 वर्षापूर्वी 20 हजार रुपयांची गुंतवणूक केली
असेल तर त्याचे मूल्य आज 1.93 कोटी रुपये म्हणजे सुमारे 2 कोटी रुपये झाले आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
https://sarkarsatta.com
कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title :- Kotak Mahindra Bank Stock | kotak mahindra bank made crorepati in 20 years only rs 20000 have been made about rs 2 crores

 

हे देखील वाचा :

Pune MNS | पुण्यातील मनसे महिला कार्यकारिणीत बदल, पुणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर

Pune Crime | ‘मार्केटिंग’वाल्या 25 वर्षीय विवाहितेला पुणे स्टेशनजवळच्या लॉजवर नेलं, कोल्ड्रींकमधून गुंगीचं औषध देऊन ‘काम’ तमाम, व्हिडीओ अन् फोटो व्हायरलची धमकी

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा राणेंवर पलटवार, म्हणाले – ‘सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, कोणी म्हणेल मीच बांधला’ (व्हिडीओ)

 

Related Posts