IMPIMP

Kushal Badrike | ‘पांडू’ मधील ‘त्या’ गाण्यावर भावूक झाले कुशल बद्रिके, म्हणाला – ‘मी मेल्यानंतर…’

by nagesh
Kushal Badrike | pandu marathi movie actor kushal badrike instagram post viral

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Kushal Badrike | कोरोना महामारीमुळे देशभरातील चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. तब्बल एक वर्षानंतर महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरु करण्यात आली. त्यामुळे नुकतंच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे सध्या मराठी चित्रपटांनी जोर धरला आहे. एका मागे एक मराठी चित्रपट सुपरहिट होत आहे. यात ‘पांडू’ (Pandu) हा चित्रपटाने प्रदर्शित होण्या आधीच धुमाकूळ घातला आहे. (Kushal Badrike)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या शो मधून सर्वांना हसवून घराघरात पोचलेले भाऊ कदम (Bhau Kadam) या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. तर त्यांच्यासोबत कुशल बद्रिके (Kushal Badrike) देखील आहेत. या दोघांच्या जोडीला लोकांनी नेहमीच डोक्यावर उचलेलं आहे. अशातच दोघांच्या चित्रपटातील गाण्यांना देखील लोकं भरभरुन प्रतिसाद देत आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) देखील आहे. या चित्रपटातील एका गाण्याची पोस्ट कुशल बद्रिकेने शेअर केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दादा परत या ना हसवा ना…., असं या गाण्याचे बोल आहे. या गाण्याची पोस्ट शेअर करत असताना कुशल बद्रिके प्रचंड भावूक झाल्याचं दिसते. ही पोस्ट शेअर करत कुशलने जे कॅप्शन दिलं आहे त्याने त्याच्या चाहत्यांना देखील भावूक केलं आहे. यावेळी मी मेल्यानंतर मीडियाकडे माझं एकतरी गाणं दाखवायला असावं असं वाटायचं, त्यामुळे असं जबरी गाणं दिल्याबद्दल तुम्हाला लै लै थँक्यू, असं कॅप्शन कुशलने दिलं आहे. तसेच त्यापुढे हे गाणं पाहण्याची देखील विनंती त्याने केली आहे. हे गाणं अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी संगीतबद्ध केलं असून आदर्श शिंदेंनी (Adarsh Shinde) ते गायलं आहे.

 

‘पांडू’ (Pandu) हा चित्रपट 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
मात्र प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट ठरली आहेत.
या चित्रपटात 1975 साली प्रदर्शित झालेला ‘पांडू हवलदार’ (Pandu Hawaldar)
या चित्रपटात दादा कोंडकेंनी (Dada Kondke) गाजवलेली भूमिका भाऊंनी साकरली आहे.

 

Web Title :-  Kushal Badrike | pandu marathi movie actor kushal badrike instagram post viral

 

हे देखील वाचा :

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | लग्नानंतर चित्रपटांमध्ये नाही दिसणार कतरीना कैफ?, स्वतः कतरीनाने सांगितली ‘ही’ गोष्ट

Akshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहच्या अदा पाहून चाहते ‘घायळ’

Earn Money | 20,000 रूपयात सुरू करा ‘या’ रोपांची शेती, सहज होईल 3.5 लाखाची कमाई, जाणून घ्या कशी?

 

Related Posts