IMPIMP

KVP Interest Rate Change | ‘किसान विकास पत्र’चे (KVP) नवीन व्याजदर घोषित, जाणून घ्या आता किती आहे नवीन व्याजदर

by nagesh
KVP Interest Rate Change | Kisan Vikas Patra Scheme kvp interest rate change check new rates here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था KVP Interest Rate Change | किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) पोस्ट ऑफिस विभागामार्फत (Post Office) चालवले जाते. केंद्र सरकारने (Central Government) ही योजना जारी केली आहे. तुम्हाला एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करून लाखोंचा रिटर्न मिळवायचा असेल, तर किसान विकास पत्र योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. (KVP Interest Rate Change)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतात 9 लहान बचत योजना चालवल्या जात आहेत. त्यापैकी ही एक योजना आहे. किसान विकास पत्राचे नवीन व्याजदर सरकारने जाहीर केले आहेत. KVP व्याजदराशी संबंधित माहिती जाणून घेवूयात…

 

काय आहे किसान विकास पत्र (What is KVP)
किसान विकास पत्र योजना ही एक प्रकारची बचत योजना आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने आपले पैसे गुंतवले तर कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याचे पैसे दुप्पट होतात.

 

योजनेंतर्गत, नागरिकांना 10 वर्षे आणि 4 महिने म्हणजेच 124 महिन्यांसाठी गुंतवणूक करावी लागेल. 124 महिन्यांनंतर मॅच्युरिटी तारखेला, तुम्हाला दुप्पट रक्कम दिली जाईल. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांव्यतिरिक्त देशातील कोणताही नागरिक अर्ज करू शकतो.

 

किसान विकास पत्राचे व्याजदर (Interest on KVP)
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यास नागरिकांना 6.9% व्याज मिळेल. ही एक लहान बचत योजना असल्याने, तिचा व्याजदर तिमाही (त्रैमासिक) व्याजाच्या आधारे ठरतात. नागरिक या खात्यात 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात आणि मॅच्युरिटी तारखेनंतर (KVP Maturity Period) लाखो रुपये मिळवू शकतात. (KVP Interest Rate Change)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

योजनेअंतर्गत, गुंतवणूकदार (Investors) कधीही त्यांचे पैसे काढू शकतात, परंतु जर एखाद्याने 1 वर्षाच्या आत पैसे काढले तर त्याला कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जातनाही आणि दंड भरावा लागू शकतो.

ही आहेत योजनेची वैशिष्ट्ये (Benefits of KVP)
या Kisan Vikas Patra मध्ये ग्राहकांना नामांकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच हे प्रमाणपत्र एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या नागरिकाच्या नावावर हस्तांतरित करता येते.

 

कोण उघडू शकतात खाते (Who Can Open KVP Account)

किसान विकास पत्रामध्ये, एक प्रौढ किंवा तीन प्रौढ मुले एकाच वेळी संयुक्त खाते उघडू शकतात.

मानसिकदृष्ट्या कमजोर किंवा मूल अल्पवयीन असेल तर अशा स्थितीत त्याचे पालक खाते उघडू शकतात.

ज्यांचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि अल्पवयीन आहे, ते स्वतःच्या नावावर खाते उघडू शकतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

खाते हस्तांतरण फक्त या अटींवर

जर एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाला, तर अशा स्थितीत खाते दिलेल्या नॉमिनीला हस्तांतरित केले जाईल.

याशिवाय, खातेधारकाच्या मृत्यूनंतर खाते संयुक्त धारकांकडे हस्तांतरित केले जाऊ शकते.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खाते हस्तांतरण करता येते.

 

Web Title :- KVP Interest Rate Change | Kisan Vikas Patra Scheme kvp interest rate change check new rates here

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | एकनाथ खडसेंची भाजपवर घणाघाती टीका; म्हणाले – ’40 वर्ष मी चांगला होतो, मात्र राष्ट्रवादीत जाताच…’

Buldhana Crime | मुख्याध्यापकाचा शाळेतच डर्टी पिक्चर ! महिलेला काम असल्याचं सांगुन शाळेत बोलवलं अन्…

Maharashtra Police | दुर्दैवी ! ट्रॅक्टर कारच्या अपघातात दोघा पोलिसांचा जागीच मृत्यू; 2 पोलीस गंभीर जखमी

 

Related Posts