IMPIMP

Lady Police Suicide Case | महिला पोलिसाच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, पतीला अटक

by nagesh
Lady Police Suicide Case | lady police anita vavhal suicide case husband arrested thane crime news

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन Lady Police Committed Suicide | पोलीस ठाण्यातील महिला कक्षातच (Women’s Room) महिला पोलीस
नाईकने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिता भीमराव व्हावळ Anita Bhimrao Vhaval (वय – 34 रा. ठाणे)
असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिला (Lady Police Committed Suicide) पोलीस नाईकचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. 16)
दुपारी दीडच्या सुमारास श्रीनगर पोलीस ठाण्यात (Srinagar Police Station) घडली होती. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागलं आहे. पोलिसांनी
अनिताच्या पतीला ताब्यात घेतले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

श्रीनगर पोलिसांकडून तपास सुरु असताना अनिताच्या पतीला ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी पतीकडून वारंवार चारित्र्यावर संशय (Doubts on Character) घेतला जात असल्याच्या कारणावरुन विवाहितेने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पती विजय झिने (Vijay Zine) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Lady Police Committed Suicide)

 

मंगळवारी पोलीस ठाण्यातील महिला कक्षात पोलीस नाईक अनिता वाव्हळ हिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या 2008 च्या बॅचच्या महिला पोलीस कर्मचारी होत्या. त्या श्रीनगर पोलीस ठाण्यात महिला पोलीस नाईक पदावर कार्यरत होत्या. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात करुन अनिता यांचे पती विजय झिने याला ताब्यात घेतले.

 

विजय झिने याची चौकशी केली असता तो अनिताच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत असल्याचे समोर आले.
चारित्र्यावर संशयातून तो अनिता हिचा मानसिक, शारिरीक छळ करायचा, तसेच तिला शिवीगाळ व मारहाण (Beating) करत होता, असेही उघड झाले.
याच जाचाला कंटाळून अनिता वाव्हळ या महिला पोलीस नाईकने श्रीनगर पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
अनिताच्या पश्चात दोन मुली असून एक दहावीत तर दुसरी सहावीला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी आरोपी विजय झिने याच्यावर आयपीसी 498 आणि 306 प्रमाणे मानसिक, शारिरीक छळ करणे व आत्महत्येस प्रवृत्त करणे असा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक वैशाली रासकर (Police Inspector Vaishali Raskar) करत आहेत.

 

Web Title : – Lady Police Suicide Case | lady police anita vavhal suicide case husband arrested thane crime news

 

हे देखील वाचा :

Men Health Tips | पुरुषांनी जरूर करावे गुळवेलचे सेवन, ‘या’ समस्यांपासून होईल सुटका

Deccan Education Society (DES) | डीईएसच्या 3500 विद्यार्थ्यांचे सामूहिक राष्ट्रगीत

White Hair | सकाळी-सकाळी करा ‘या’ गोष्टींचा 5 प्रकारे वापर, केस पांढरे होण्याच्या समस्येपासून होईल सुटका

 

Related Posts