IMPIMP

Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप, साधू PM मोदींकडे मागणी करत म्हणाले…

by nagesh
Lata Mangeshkar | Hawan performed for the recovery of singer lata mangeshkar in ayodhya request pm modi to meet her says jagadguru paramhans acharya maharaj

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर मागील 18 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital) अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहेत. शनिवारी 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोना (Corona) आणि न्यूमोनियाची लागण (Pneumonia Infection) झाली होती. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशभरामधून प्रार्थना केल्या जात आहेत. असं असतानाच अयोध्येमध्ये (Ayodhya) महामृत्यूंजय मंत्राचा (Mahamrityunjaya Mantra) जप करण्यात आला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

92 वर्षाच्या लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी यासाठी अयोध्येमध्ये आचार्य पीठाच्या तपस्वी छावणीमध्ये राजसूय महायज्ञाचं (Rajasuya Mahayagya) आयोजन करण्यात आले होते. महायज्ञ तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य (Peethadheeshwar Jagadguru Paramahansa Acharya) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी महामृत्युंजय आणि संकटमोचन हनुमानाच्या मंत्राचा (Hanuman Mantra) जप करण्यात आला. याशिवाय वेदमंत्रांच्या (Vedmantra) उच्चारांसहीत यज्ञशाला मध्ये आहुती समर्पित करण्यात आली.

 

 

PM मोदींना विनंती करतो की…
जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले,
गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही महामृत्युंजय यज्ञ केला.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) विनंती करतो की त्यांनी लता मंगेशकर यांची भेट घ्यावी.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी (Dr Pratit Samdani) यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
लतादीदींच्या प्रकृतीत कालपासून सुधारणा होत आहे.
मात्र, तरीही त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
त्या लवकर ठिक व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा, असंही डॉ. समदानी यांनी म्हटले होते.

 

Web Title :- Lata Mangeshkar | Hawan performed for the recovery of singer lata mangeshkar in ayodhya request pm modi to meet her says jagadguru paramhans acharya maharaj

 

हे देखील वाचा :

Weight Loss Tips | लठ्ठपणाने त्रस्त आहात का? ‘या’ सोप्या पद्धतीने कमी करा पोटावर जमा झालेली चरबी

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 8,334 रुपये मासिक जमा केल्यास मिळतील 7 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | …तर राज्यात आर्थिक संकट – अजित पवार

Padma Bhushan Award | सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण’, राज्यातील ‘या’ 10 जणांना ‘पद्म’ पुरस्कार

 

Related Posts