IMPIMP

Lemon | गरजेपेक्षा जास्त लिंबू सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकते नुकसानकारक, जाणून घ्या त्याचे तोटे

by nagesh
Lemon | excessive consumption of lemon can be harmful for your health know its disadvantages

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Lemon | कोरोना महामारी (Coronavirus) सुरू झाल्यापासून लोक इम्युनिटीच्या (Immunity) बाबतीत खुपच अलर्ट झाले आहेत. काहीजण घरगुती काढे आणि इतर उपायांनी आपली इम्युनिटी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणे त्रासदायक सुद्धा ठरू शकते. अनेकजण व्हिटॅमिन सी (Vitamin C) साठी लिंबूपाणी (Lemon Water) किंवा काढ्यामध्ये लिंबू रस टाकून त्याचे सेवन करतात, परंतु लिंबूचे जास्त सेवन नुकसानकारक ठरू शकते. लिंबूच्या अतिसेवनाचे तोटे जाणून घेवूयात. (Lemon)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1. दात खराब होऊ शकतात (Teeth can be damaged)
रोज लिंबू पाणी प्यायल्याने दातांचा इनॅमल खराब होतो. दात किडण्यास सुरूवात होऊ शकते. लिंबाच्या रसामध्ये असलेल्या अ‍ॅसिडमुळे ही समस्या उद्भवू शकते.

 

2. पोटाचा त्रास (Stomach Problems) –
लिंबूपाणी जास्त प्रमाणात आणि नियमितपणे घेतल्यास पोटाला हानी पोहोचू शकते. लिंबूपाणी जास्त प्यायल्याने छातीत जळजळ आणि अल्सरचा धोका देखील वाढू शकतो.

3. हाडांचे होऊ शकते नुकसान (May cause bone damage) –
लिंबूपाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने हाडांवरही वाईट परिणाम होतो. संशोधनानुसार, लिंबाचा रस हाडांमध्ये असलेले तेल शोषून घेतो. यामुळे हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. (Lemon)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

4. मायग्रेनच्या वेदना (Migraine pain)
आरोग्य तज्ञांच्या मते, लिंबूसारख्या आंबट फळांचे जास्त सेवन केल्याने देखील मायग्रेनची समस्या उद्भवू शकते. अभ्यासानुसार, जर एखाद्या व्यक्तीला आधीच मायग्रेनची समस्या असेल तर त्याने लिंबूचे सेवन करताना काळजी घ्यावी.

 

5. डिहायड्रेशन (Dehydration) –
संशोधनानुसार, लिंबाच्या रसामध्ये एस्कॉर्बिक अ‍ॅसिड किंवा व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते.
त्यामुळे किडनीमध्ये लघवीचे उत्पादन वाढते. किडनी शरीरात साचलेले अतिरिक्त मीठ आणि द्रव बाहेर काढण्यास मदत करते.
पण लिंबू पाणी जास्त प्यायल्याने लघवीला वारंवार होते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते.

 

 

Web Title :- Lemon | excessive consumption of lemon can be harmful for your health know its disadvantages

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोरोना नियमांचे उल्लंघन, पुण्यातील 4 प्रसिद्ध हॉटेलवर मुंढवा पोलिसांची कारवाई

Pune Crime | धक्कादायक! भररस्त्यात पत्नीचा गळा दाबून रस्त्यावर आपटले, पुण्यातील घटना

PMC Abhay Yojna | अभय योजना फक्त रहिवासी मिळकतींसाठी ! मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली मंजुरी, कमर्शियल मिळवकींवर कारवाई सुरुच राहणार

 

Related Posts