IMPIMP

Pune Crime | कोरोना नियमांचे उल्लंघन, पुण्यातील 4 प्रसिद्ध हॉटेलवर मुंढवा पोलिसांची कारवाई

by nagesh
Pune Crime | pune mundhwa police take action against four hotels for violating corona norms

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यात (Pune Crime) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दोन डोस (Two Doses) घेतलेल्या व्यक्तींनाच कार्यालय, उपहारगृह, हॉटेलमध्ये प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कोरोना नियमांचे उल्लंघन करुन ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देणाऱ्या पुण्यातील (Pune Crime) चार हॉटेलवर मुंढवा पोलीस ठाण्यातील (Mundhwa Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई (Action Against Four Hotel) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुण्यात (Pune Crime) कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
लसीकरण (Vaccination) आणि गर्दी टाळणे हाच प्रभावी उपाय असल्याने प्रशासनाने नियम व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मास्क
अनिवार्य करण्यात आले असून मॉल, हॉटेल व अन्य सार्वजनिक ठिकाणी दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी आहे. परंतु पुण्यातील (Pune
Crime) मुंढवा परिसरातील चार हॉटेल चालकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मुंढवा
परिसरातील चार बड्या हॉटेलांना याचा पहिला फटका बसला आहे.

 

 

मुंढवा परिसरातील हॉटेल ड्रंक अँड पांडा (Hotel Drunk & Panda), अजेंट जॅक (Agent Jack), हॉटेल मेट्रो (Hotel Metro) आणि हॉटेल लोकलमध्ये (Hotel Local) नियमांचे सर्रास उल्लंघन सुरु होतं. लसीचे दोन डोस पूर्ण न झालेल्या व मास्क (Mask) नसलेल्या व्यक्तींनाही हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या हॉटेवर कारवाई करुन हॉटेल मॅनेजरवर 188, 269, 270 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

हॉटेल ड्रंक अँड पांडाचा मॅनेजर रवी जनार्दन घोडके (वय-24), लोकल हॉटेलचा मॅनेजर मारुती कोंडीबा गोरे (वय-31), हॉटेल मेट्रोचा मॅनेजर कुणाल दशरथ मद्रे (वय-26) आणि हॉटेल अजेंट जॅकचा मॅनेजर राम जगन्नाथ गाढवे (वय-32) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी (Senior Police Inspector Brahmanand Naikwadi) यांनी सांगितले की, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांचे सुचनेुनासर हद्दीमध्ये तपासणी केली जात असताना या चारही हॉटेल्समध्ये पोलिसांना हॉटेलच्या क्षमतेपेक्षा 50 टक्के याच्यापेक्षा जास्त गर्दी जमलेली दिसून आली. हॉटेल व्यवस्थापकाने शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियम व अटीच्या अधीन राहून हॉटेल व्यवसाय चालवणे आवश्यक होते. परंतु तसे काही केलेले नसल्याने 50 टक्के क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक ठेवून नियमांचा भंग केला म्हणून ही कारवाई करण्यात आली.
आरोपींनी कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास मदत केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाचे त्यांनी सांगितले.

 

 

Web Title : Pune Crime | pune mundhwa police take action against four hotels for violating corona norms

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक! भररस्त्यात पत्नीचा गळा दाबून रस्त्यावर आपटले, पुण्यातील घटना

PMC Abhay Yojna | अभय योजना फक्त रहिवासी मिळकतींसाठी ! मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली मंजुरी, कमर्शियल मिळवकींवर कारवाई सुरुच राहणार

Pimpri-Chinchwad News | पिंपरीत लोकप्रतिनिधींकडून कोरोना नियमांचे उल्लंघन; गर्दी करत विकासकामांचे केले उद्धाटन

 

Related Posts