IMPIMP

LIC IPO | पुढील महिन्यात येणार्‍या पब्लिक ऑफरमध्ये PMJJBY च्या पॉलिसीधारकांना मिळणार नाही सूट, एलआयसीने जारी केले स्पष्टीकरण

by nagesh
How To Surrender LIC Policy | do you want to surrender lic policy guess what to do know about process

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC IPO | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) च्या पॉलिसीधारकांना (Policyholders) एलआयसीच्या आयपीओ (LIC IPO) मध्ये कोणतीही सूट मिळणार नाही. पुढील महिन्यात आयपीओसाठी तयारी करत असलेल्या एलआयसीने स्पष्ट केले की पीएमजेजेबीवाय (PMJJBY) हे एक ग्रुप इन्श्युरन्स प्रॉडक्ट (Group Insurance Product) आहे आणि त्याचे पॉलिसीधारक सवलतीसाठी पात्र नाहीत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यापूर्वी, एलआयसीचे अध्यक्ष (LIC Chairman) एम.आर. कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की पीएमजेजेबीवायच्या पॉलिसीधारकांनाही आयपीओमध्ये सूट मिळण्याचा अधिकार आहे. चेअरमनच्या या वक्तव्यानंतर देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने एक निवेदन जारी करून स्पष्ट केले आहे की PMJJBI पॉलिसीधारकांना मार्चमध्ये येणार्‍या IPO मध्ये कोणताही लाभ मिळणार नाही. कंपनीच्या चेअरमनने हे नकळत म्हटल्याचे सांगण्यात आले आहे.

 

वाढवले भागभांडवल
IPO सुलभ करण्यासाठी, एलआयसीचे भागभांडवल गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 100 कोटी रुपयांवरून 6325 कोटी रुपये वाढवले होते. 13 फेब्रुवारी रोजी बाजार नियामक सेबीकडे दाखल केलेल्या डीआरएचपीमध्ये म्हटले आहे की, हा प्रस्ताव सरकारद्वारे अंदाजे 63,000 कोटी रुपयांमध्ये 5 टक्के हिस्सेदारी विकण्यासाठी आहे. (LIC IPO)

 

कमाल दोन लाख रुपयांपर्यंत बोली
आयपीओसाठी गेल्या आठवड्यात दाखल ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, एलआयसीच्या पात्र विमाधारकांना आयपीओमध्ये आरक्षण दिले जाईल. या अंतर्गत, प्रति व्यक्ती कमाल बोली रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ज्यांच्याकडे बोली उघडण्याच्या तारखेनुसार एक किंवा अधिक एलआयसी पॉलिसी आहेत आणि जे भारताचे रहिवासी आहेत ते पॉलिसीधारक आरक्षणांतर्गत अर्ज करू शकतात. असे दिलेले आरक्षण आयपीओच्या आकाराच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.

70 लाख लोकांनी पॅन कार्ड केले अपडेट
आत्तापर्यंत एलआयसीच्या 60-70 लाख पॉलिसीधारकांनी वेबसाइटवर त्यांचे पॅन कार्ड अपडेट केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून, पॉलिसीधारक त्यांचे पॅन कार्ड पॉलिसीसोबत अपडेट करत आहेत.
खरेतर, ज्यांचे पॅन कार्ड पॉलिसीमध्ये अपडेट केलेले नाही ते पॉलिसीधारक राखीव भागांतर्गत शेअर्ससाठी अर्ज करू शकणार नाहीत.
यामुळेच ग्राहक जलदगतीने अपडेट करत आहेत.

 

बाजारात आयपीओची मोठी चर्चा
युक्रेनच्या संकटानंतर शेअर बाजारावर आलेल्या दबावादरम्यान, अर्थमंत्र्यांनी एलआयसी आयपीओ पुढे ढकलण्याची शक्यता फेटाळून लावली असून,
बाजारात आयपीओची चर्चा सुरू आहे. गुंतवणूकदारही यामध्ये मोठी उत्सुकता दाखवत आहेत.
त्यामुळेच सरकार या मुद्द्यावरून पुढे जात आहेत.
एलआयसीचा आयपीओ हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- LIC IPO | lic ipo pradhan mantri jeevan jyoti bima yojna policyholders not eligible for shares at discounted lic clarify

 

हे देखील वाचा :

Tata Group Share | 5 दिवसांपासून टाटाची कंपनी देत आहे गुंतवणुकदारांना झटका, आता डाव लावण्याचा मिळेल फायदा !

Child’s Nutrition Tips | 2 वर्षानंतर पुन्हा शाळेत जात आहेत मुले, ‘या’ 5 टिप्सच्या मदतीने करा त्यांची नवीन लाईफस्टाइल मॅनेज

Nawab Malik | नवाब मलिक राजीनामा देणार?; शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय?

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 165 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts