IMPIMP

LIC Jeevan Shiromani Plan | 16 वर्षापर्यंत भरावा लागेल प्रीमियम, नंतर LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये मिळेल रू. 1 कोटी रिटर्न

by nagesh
LIC Jeevan Shiromani Plan | lic jeevan shiromani plan pay premium in this lic policy to get rs 1 crore return

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाLIC Jeevan Shiromani Plan | भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) देशातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन गुंतवणुकीचे विविध पर्याय ऑफर करते. जर तुम्ही बंपर रिटर्नसह खात्रीशीर फायद्याची योजना शोधत असाल, तर LIC ची योजना तुमचा शोध संपवू शकते. या योजनेचे नाव एलआयसी जीवन शिरोमणी योजना (LIC Jeevan Shiromani Plan) आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या योजनेबद्दल जाणून घ्या
एलआयसीची जीवन शिरोमणी योजना (LIC Jeevan Shiromani Plan) ही एक नॉन – लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, इंडिव्हिज्युअल, जीवन विमा बचत योजना आहे. ही लिमिटेड प्रीमियम पेमेंट मनी बॅक जीवन विमा योजना आहे. ही योजना हाय नेट-वर्थ व्यक्तींसाठी आहे.

 

किमान इतक्या समअ‍ॅश्युयर्डसाठी घेऊ शकता प्लान

जर तुम्हाला एलआयसीची ही योजना घ्यायची असेल, तर तुम्हाला किमान एक कोटी रुपयांच्या मूळ विमा रकमेसह हा प्लॅन घ्यावा लागेल. यामध्ये कमाल विम्याच्या रकमेवर मर्यादा नाही. तुम्ही या योजनेत प्रीमियम वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक आधारावर भरू शकता.

 

किती असावे वय
LIC’s Jeevan Shiromani Plan खरेदी करण्यासाठी, व्यक्तीचे वय 18 वर्षे असावे.
45 वर्षांखालील व्यक्ती 20 वर्षांच्या मुदतीसाठी ही पॉलिसी घेऊ शकते.
त्याच वेळी, 45 – 48 वर्षे वयोगटातील लोक कमाल 18 वर्षांच्या कालावधीसाठी पॉलिसी घेऊ शकतात.

48 ते 51 वर्षे वयोगटातील व्यक्ती जास्तीत जास्त 16 वर्षे कालावधीसाठी ही पॉलिसी घेऊ शकते.
त्याच वेळी, 55 वर्षांपर्यंतची व्यक्ती ही योजना 14 वर्षांच्या कमाल पॉलिसी टर्मसह घेऊ शकते.

 

 

कर्ज देखील घेऊ शकता
या प्लॅनमध्ये कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. किमान एक वर्ष प्रीमियम भरल्यानंतर तुम्ही कर्ज घेऊ शकता.
प्लॅनमधील अटींनुसार तुम्ही कर्ज घेऊ शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एक कोटीच्या विमा रकमेसाठी प्रीमियम
LIC Calculator  नुसार, जर 29 वर्षांच्या व्यक्तीने 20 वर्षांसाठी ही पॉलिसी घेतली तर त्याला 16 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
त्याला पहिल्या वर्षासाठी दरमहा करांसह 61,438 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

त्याच वेळी, दुसर्‍या वर्षापासून, व्यक्तीला दरमहा 60,114.82 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल.
मॅच्युरिटीवर तुम्हाला 1,34,50,000 रुपये मिळतील. पॉलिसीधारकांना सर्व्हायव्हल बेनिफिट देखील मिळतो.
याशिवाय, पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, ठराविक रक्कम – विमाधारक नॉमिनीला मिळते.

 

 

Web Title :- LIC Jeevan Shiromani Plan | lic jeevan shiromani plan pay premium in this lic policy to get rs 1 crore return

 

हे देखील वाचा :

Diabetes Diet | उन्हाळ्यात शुगर कंट्रोल करण्यासाठी प्रभावी आहेत ‘हे’ 5 हेल्दी ड्रिंक, बॉडी ठेवतील कूल; जाणून घ्या

PM Kisan eKYC आता का आहे बंद, याच्याशिवाय 11वा हप्ता मिळणार नाही का ? जाणून घ्या

Pune Police | पुणे शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत; जाणून घ्या कारण

 

Related Posts