IMPIMP

LIC Jeevan Umang Policy | ‘या’ स्कीममध्ये दररोज करा 45 रुपयांची गुंतवणूक, एकाच वेळी मिळतील 36 लाख

by nagesh
LIC Jeevan Umang Policy | jeevan umang policy invest 1350 rupees per month and get 36 lakhs rupees return

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनLIC Jeevan Umang Policy | लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ग्राहकांना अनेक प्रकारच्या योजना ऑफर करते. चांगला रिटर्न आणि सुरक्षित गुंतवणुकीमुळे देशातील लाखो लोक त्यांचे पैसे एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवतात. (LIC Jeevan Umang Policy)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तुम्ही एलआयसीच्या स्कीममध्ये दीर्घकाळ पैसे गुंतवण्याचा विचार करत असल्यास, जीवन उमंग पॉलिसी निवडू शकता. जीवन उमंग पॉलिसी (LIC Jeevan Umang Policy) ही एक एंडॉवमेंट योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकता.

 

कोण खरेदी करू शकतात पॉलिसी

एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी घेणार्‍यांना 100 वर्षांसाठी जीवन विमा (Life Insurance) संरक्षण मिळते. 90 दिवसांपासून ते 55 वर्षे वयोगटातील लोक हा प्लॅन खरेदी करू शकतात.

या पॉलिसीच्या मुदतपूर्तीनंतर, पॉलिसीधारकाच्या खात्यात एक निश्चित रक्कम दरवर्षी येत राहते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला संपूर्ण रक्कम एकरकमी दिली जाते.

 

कर सवलत

तुम्ही जीवन उमंग पॉलिसीमध्ये 15, 20, 25 किंवा 30 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.
जर पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला किंवा तो अपंग झाला, तर त्याला उमंग पॉलिसी अंतर्गत टर्म रायडर देखील प्रदान केला जातो.
तसेच या योजनेत गुंतवणूक करणार्‍यांना करात सूट मिळते.

जीवन उमंग पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणार्‍यांना प्राप्तीकराच्या कलम 80सी अंतर्गत करातून सूट देण्यात आली आहे.
तुम्हाला जीवन उमंग पॉलिसी घ्यायची असेल, तर तुम्हाला किमान दोन लाख रुपयांचा विमा घ्यावा लागेल.

 

36 लाख रुपयांचा मिळेल रिटर्न

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 26 व्या वर्षी जीवन उमंग पॉलिसी खरेदी केली आणि 4.5 लाख रुपयांच्या विमा संरक्षणासाठी 30 वर्षांसाठी प्रीमियम भरला तर दरमहा 1350 रुपये भरावे लागतील.
अशा प्रकारे, तुम्हाला या योजनेच्या गुंतवणुकीसाठी दररोज 45 रुपये वाचवावे लागतील.

या बाबतीत, तुमचा प्रीमियम एका वर्षात 15882 रुपये असेल आणि 30 वर्षांमध्ये तुमचा प्रीमियम 47,6460 रुपये असेल.
अशा प्रकारे, एलआयसी 31 व्या वर्षापासून तुमच्या गुंतवणुकीवर रिटर्न म्हणून दरवर्षी 36 हजार रुपये जमा करण्यास सुरुवात करेल.
अशा प्रकारे, 31 व्या वर्षापासून ते 100 वर्षे वयापर्यंत, दरवर्षी 36,000 रुपयांचा रिटर्न मिळेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- LIC Jeevan Umang Policy | jeevan umang policy invest 1350 rupees per month and get 36 lakhs rupees return

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘कुत्र्या तुझे उदे उदे करुन टाकतो’, व्याज दिले असतानाही रस्त्यावर आणण्याची धमकी देणार्‍या सावकारावर FIR

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर म्हणाले – ‘वेळीच निर्णय…’

Ultimate Kho Kho-Punit Balan | उद्योगपती पुनीत बालन आणि रॅपर बादशाह यांनी अल्टीमेट खो-खोसाठी मुंबई संघाची केली खरेदी

 

Related Posts