IMPIMP

LPG Gas Cylinder Price | दिलासादायक ! LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात; जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

by nagesh
LPG Gas Cylinder Charges | If the delivery boy is charging extra for 'gas tank delivery' then read this post

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LPG Gas Cylinder Price | जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिलासादायक माहिती समोर आली आहे. एलपीजी गॅस (LPG Gas Cylinder Price) सिलिंडरच्या दरात मोठी कपात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील प्रमुख गॅस कंपन्यांकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत (Gas Cylinder Price) तब्बल 198 रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु, दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत (Domestic Gas Cylinder) कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा दर स्थिर आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, नव्या दरानुसार आता राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) व्यवसायिक गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर 2,021 रुपये इतकी झाली आहे. कपात करण्यापूर्वी गॅस सिलिंडरचे भाव 2,219 रुपये इतके होते. गेल्या महिन्यातही गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात केली होती. जून महिन्यात गॅस कंपन्यांनी व्यवसायिक सिलिंडरच्या किंमतीत 136 रुपयांची कपात करण्यात आली होती. सलग 2 महिने व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात झाल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळालाय. यामुळे आता हॉटेलमधील जेवण देखील काही प्रमाणात स्वस्त होण्याची शक्यता आहे. (LPG Gas Cylinder Price)

 

नवे गॅस कनेक्शन महागले –

आता नवे गॅस कनेक्शन घेणे देखील परवडणारे झाले नाही. जर तुम्हाला नव्या व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे कनेक्शन घ्यायचे असेल तर जादा पैसे मोजावे लागतील. गॅस कंपन्यांकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या कनेक्शन किंमतीत प्रति कनेक्शन 1,050 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी व्यवसायिक गॅस सिलिंडरचे कनेक्शन 2,550 रुपयांना मिळत होते. आता त्यात वाढ होऊन ते 3,600 रुपयांवर पोहोचले. त्याचबरोबर दुसरीकडे मात्र मागील 2 महिने व्यवसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

प्रमुख शहरातील दर – (19 किलोच्या व्यवसायिक गॅस सिलिंडर दर)

दिल्ली – 2,021 रुपये

कोलकाता – 2,140 रुपये

मुंबई – 1,981 रुपये

चेन्नई – 2,186 रुपये

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- LPG Gas Cylinder Price | Big reduction in the price of lpg gas cylinders know new rates

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी शिंदे…’ एकनाश शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पण उपमुख्यमंत्री बनून

Gold-Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक, प्लास्टिक बॅन आणि नवीन कामगार कायदा…जाणून घ्या 1 जुलैपासून होणार कोण-कोणते बदल

 

Related Posts