IMPIMP

LPG Gas Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, 7 मार्चनंतर घरगुती गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार?

by nagesh
LPG Gas Price Hike | lpg price commercial cylinder price increased by rs 105 check new rates

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LPG Gas Price Hike | रशिया- युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दाचा परिणाम संपूर्ण जगावर जाणवू लागला आहे. पेट्रोलियम पदार्थांबरोबरच अन्य वस्तूंचेही भाव वाढल्याचे दिसू लागले आहे. एलपीजी सिलेंडरचे आज नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यात  व्यावसायिक सिलेंडरची किंमत १०५ रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे आजपासून १९ किलो व्यावसायिक सिलेंडर २०१२ रुपयांना मिळणार आहे. मुंबईत १९ किलोसाठी १ हजार ९६३ रुपये द्यावे लागतील. दरम्यान ५ किलो सिलेंडरची किंमत २७ रुपयांनी वाढणार आहे. आता दिल्लीत ५ किलो सिलेंडरसाठी ५६९ रुपये मोजावे लागतील. घरगुती सिलेंडरच्या किमतीत तूर्त वाढ करण्यात आली नसली तरी पाच राज्यांच्या निवडणुकानंतर म्हणजे साधारण उत्तर प्रदेशात विधानसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान ३ मार्च आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान ७ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे ७ मार्चनंतर घरगुती गॅस सिलेंडरसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहे. (LPG Gas Price Hike)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

निवडणुकीनंतर घरगुती गॅस सिलेंडरमध्ये १०० ते २०० रुपये वाढ?

देशातील पाच राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांपासून विना अनुदाणीत सिलेंडरच्या किमती जास्त वाढल्या नाही. विशेष म्हणजे कच्च्या तेलाचे दर १०२ डॉलर प्रति बॅरेल झाले. तरीही ऑक्टोबर २०२१ पासून घरगुती सिलेंडर फारसे बदलले गेले नाही. त्यामुळे निवडणुकीचा अखेरचा टप्पा झाल्यानंतर घरगुती सिलेंडरच्या किमती १०० ते २०० रुपयांनी वाढण्यासाची शक्यता आहे. (LPG Gas Price Hike)

 

ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १७० रुपयांपर्यंत वाढ झाली. पण ६ ऑक्टोबर २०२१ नंतर घरगुती सिलेंडरच्या दर स्थिर राहिले होते. त्यामुळे निवडणुकीनंतर दर वाढणार हे निश्चित मानले जात आहे.

 

Web Title :- LPG Gas Price Hike | lpg price commercial cylinder price increased by rs 105 check new rates

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा

Pune Crime | 37 लाखाच्या फसवणूक प्रकरणी ‘इंडिया होम लोन’च्या 3 अधिकार्‍यांविरूध्द पुण्यात गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Manu Kumar Srivastava | राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती

 

Related Posts