IMPIMP

Manu Kumar Srivastava | राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती

by nagesh
Manu Kumar Srivastava | manu kumar srivastava new chief secretory of maharashtra

मुंबई: सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्र राज्याच्या मुख्य संचिवपदी (Chief Secretary of Maharashtra) मनुकुमार श्रीवास्तव (Manu Kumar Srivastava) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनुकुमार श्रीवास्तव (Manu Kumar Srivastava) हे 1986 च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार (Service Seniority) श्रीवास्तव यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे. मावळते मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांना मुदतवाढ न मिळाल्याने ते आज सेवानिवृत्त (Retired) झाले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

कोण आहेत मनुकुमार श्रीवास्तव

मनुकुमार श्रीवास्तव (Manu Kumar Srivastava) सध्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary) आहेत. देबाशिष चक्रवर्ती यांच्या निवृत्तीनंतर मनोज सैनिक (Manoj Sainik) आणि नितीन करीर (Nitin Karir) यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सेवा ज्येष्ठतेनुसार मनुकुमार यांना संधी मिळाली. श्रीवास्तव यांना गायनाचा छंद (Singing Hobby) आहे. सुमधूर आवाजामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचं युट्यूब चॅनलही आहे. त्या माध्यमातून ते आपली विविध गाणी प्रेक्षकांना ऐकवत असतात.

 

 

प्रशासनाचा दांडगा अनुभव

मनुकुमार श्रीवास्तव यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. कोल्हापूर (Kolhapur) आणि नागपूर (Nagpur) याठिकाणी जिल्हाधिकारी (Collector) म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या कामामुळे त्यांची कारकीर्द गाजली. सुरुवातीच्या काळात त्यांनी माहाराष्ट्रातील ग्रामीण भागात रचनात्मक काम केले. यानंतर 2008 मध्ये ते मुंबईत आले. मंत्रालयात  गृह नगरविकास, महसूल,खात्यांचे सचिव म्हणून काम पाहिले. आज त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड करण्यात आली.

 

 

Web Title :- Manu Kumar Srivastava | manu kumar srivastava new chief secretory of maharashtra

 

हे देखील वाचा :

Governor Bhagat Singh Koshyari | छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण, माफी मागण्याचं टाळलं

ICAI Pune | आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षपदी सीए काशिनाथ पठारे; उपाध्यक्षपदी सीए राजेश अग्रवाल, सचिवपदी सीए प्रीतेश मुनोत, खजिनदारपदी सीए प्रणव आपटे यांची निवड

Sharad Pawar | राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा सभेतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

 

Related Posts