IMPIMP

M.R.Poovamma | आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या ‘या’ भारतीय खेळाडूवर 2 वर्षांची बंदी

by nagesh
M.R.Poovamma | asian games medalist mr poovamma handed 2 year ban by anti doping appeal panel

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन  M.R.Poovamma | क्रीडा विश्वातून एक खळबळजनक घटना समोर अली आहे. यामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती असलेली भारतीय धावपटू एम.आर.पूवम्मा हि गेल्यावर्षी डोपिंग (Doping test) प्रकरणात दोषी आढळली होती.त्यावेळी तिच्यावर 3 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता तिच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. शिस्तपालन समितीनं तिच्यावर घातलेली 3 महिन्यांची बंदी रद्द करून ‘नाडा’च्या डोपिंगविरोधी अपील पॅनलने तिच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. (M.R.Poovamma)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मागील वर्षी 18 फेब्रुवारी रोजी पतियाळात इंडियन ग्रँड प्रीक्स -1 या स्पर्धेदरम्यान पूवाम्माची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये जागतिक डोपिंग विरोधी संस्थेनं बंदी घातलेला मिथाइल हेक्सेन अमाइन हा अमली पदार्थ पूवम्माच्या शरीरात आढळून आला होता. यानंतर डोपिंगविरोधी शिस्तपालन पॅनेलने जून महिन्यात पूवम्मावर कारवाई करून तिला तीन महिन्यांसाठी निलंबित केले होते. यानंतर शिस्तपालन समितीनं घेतलेल्या या निर्णयाविरोधात अपील करण्यात आल्यानंतर ‘एडीएपी’ने पूवम्माच्या खेळण्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. (M.R.Poovamma)

 

 

पूवम्माची आतापर्यंतची कामगिरी

2018 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत 4×400 मीटर महिला आणि मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघामध्ये पूवम्माचा सहभाग होता. 2014 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत 4×400 मीटर रिले संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्या टीममध्येही पूवम्माचा सहभाग होता. 2012 मध्ये आशियाई खेळांमध्ये पूवम्माने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत वैयक्तिक कांस्यपदक जिंकले होते. तिच्या या कामगिरीमुळे तिला राज्य सरकारकडून अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

 

डोपिंग म्हणजे नेमकं काय?

मैदानावरची आपली कामगिरी प्रतिस्पर्ध्यापेक्षा सरस व्हावी, यासाठी खेळाडूंकडून काही औषधं किंवा ड्रग्ज घेतली जातात.
कोणती औषधं किंवा कोणते घटक पदार्थ असलेली औषधं किंवा द्रव्य घेतली जाऊ नयेत, याचे काही नियम ठरलेले असतात.
हे प्रतिबंधित घटक खेळाडूच्या शरीरात आढळल्यास त्याला डोपिंग (Doping test) असे म्हंटले जाते.
प्रत्येक स्पर्धेआधी हि डोपिंग टेस्ट केली जाते. राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था व जागतिक डोपिंग विरोधी संस्थेकडून हि डोपिंग टेस्ट केली जाते.
या डोपिंग टेस्टसाठी खेळाडूंच्या लघवीचा नमुना घेतला जातो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  M.R.Poovamma | asian games medalist mr poovamma handed 2 year ban by anti doping appeal panel

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे स्टेशनला जाण्यास नकार देणार्‍या कॅबचालकावर चाकू हल्ला करणार्‍याने पोलिसांना केले जखमी

T-20 World Cup | T-20 वर्ल्डकप आधी ICC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, 1 ऑक्टोबरपासून होणार लागू

Pune Crime | टोळक्याने दुकानात घुसून तोडफोड करीत पसरविली दहशत; वाकड येथील भूमकर चौकात घातला राडा

 

Related Posts