IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | …म्हणून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबला ?

by nagesh
Shinde-Fadnavis Government | Another failure of the Shinde-Fadnavis government, another project lost in the hands of Maharashtra?

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Cabinet Expansion | राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार (Devendra Fadnavis Government) स्थापन झाले. मात्र दोन आठवडे होत आले तरी मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झालेला नाही. दोनच मंत्री सध्या संपूर्ण राज्याचा कारभार बघत आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सांगण्यात येत होते. 19 जुलैला हा विस्तार होईल अशी चर्चा होती, मात्र आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे.

 

राष्ट्रपती निवडणुकीत (Presidential Election) नाराजी टाळण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होत नव्हता.
तो लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगितले जात होते.
त्याचवेळी 19 ते 21 जुलैदरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे.
मोजक्या 10 मंत्र्यांना यावेळी शपथ दिली जाणार होती.
परंतु बंडखोर आमदारांची सध्याच्या सरकारला नाराजी भोवण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याची चर्चा आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या (Shivsena Rebel MLA) नाराजीची भीती आणि शिंदे गटाकडून (Shinde Group)
अधिकच्या मंत्रिपदाची मागणी तसेच भाजपमध्ये (BJP) मंत्रिपदासाठी सुरु असलेली रस्सीखेच आणि मंत्रिपदासाठी होत नसलेले एकमत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा शपथविधी लांबणीवर पडला आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नाराजी नाट्य होऊन त्याचा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो.
त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर 19 ते 21 जुलैच्या दरम्यान शपथविधी होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

या मंत्रिमंडळामध्ये भाजपला 29 कॅबिनेट मंत्रीपद हवी आहेत. तर शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी 13 मंत्रिपद हवी आहेत.
शिंदे गटात आधीच शिवसेनेचे सात मंत्री आहेत. शिंदे गटात 40 बंडखोर आणि 10 अपक्ष आमदार आहेत.
त्यामुळे शिंदे गटाला जास्त मंत्रिपद हवी आहेत.
6 आमदारांमागे एक मंत्रिपद अशी अट शिंदे गटाकडून घालण्यात आली असून 19 मंत्रिपद हवी अशी मागणी आहे.
भाजपने याला होकार दिला नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे.

 

Web Title :-  Maharashtra Cabinet Expansion | for this reason eknath shinde devendra fadnavis cabinet expansion delayed

 

हे देखील वाचा :

Healthy Diet | हेल्दी डाएटमध्ये लपले आहे दिर्घायुष्याचे रहस्य, रिसर्चमध्ये झाला खुलासा

Anil Bhosale | माजी आमदार अनिल भोसले यांच्या जमिनीचा लिलाव, बाजार समितीने खरेदी केली ‘एवढ्या’ कोटी रुपयांना

Low BP | अचानक कमी झाला ‘ब्लड प्रेशर’ तर असा करा नॉर्मल, जाणून घ्या

 

Related Posts