IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : दत्तवाडी पोलिस स्टेशन – भावाने घेतलेले पैसे परत न केल्याने आईवडिलांचे केले अपहरण ! भाऊ झाला फरार, बहिण, पतीला ठेवले डांबून

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News: Dattawadi Police Station – Parents kidnapped for not returning money taken by brother! Brother absconded, sister, husband kept in custody

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | गरजेच्या वेळी त्याने गळ्यातील सोन्याची चैन देऊन ती गहाण ठेवायला सांगून मदत केली. पण मदतीची जाणीव न ठेवता त्याने पैसे परत केले नाही. उलट तो पळून गेला. तेव्हा त्याने त्याची बहिण, आईवडिल यांचे अपहरण करुन डांबुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी दत्तवाडी येथे राहणार्‍या एका २९ वर्षाच्या महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११६/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुणाल रावळ, पांचाळ, कुणाल रावळ याची पत्नी व त्यांचा साथीदार अशा चौघांवर अपरहणाचा गुन्हा (Kidnapping Case) दाखल केला आहे. ही घटना सारसबाग Saras Baug (Pune) ते नांदेड सिटीजवळील (Nanded City Pune) फ्लॅटमध्ये १६ ते २० एप्रिल दरम्यान घडली. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा भाऊ संकेत टकले याला पैशांची गरज होती. तेव्हा कुणाल रावळ याने स्वत:च्या गळ्यातील सोन्याची चैन देऊन ती गहाण ठेवून पैसे घेण्यास सांगितले. संकेत याने ही चैन घेतली. मात्र, त्यानंतर त्याने ती चैन सोडवून आणली नाही. त्याच्या व्याजाचे पैसेही दिले नाही. कुणाल रावळ याने वारंवार मागणी केल्यानंतरही तो पैसे देत नव्हता. त्याचे आईवडिल, बहिण यांना सांगूनही तो पैसे परत करत नव्हता. त्यानंतर तो गायब झाला. १६ एप्रिल रोजी कुणाल याने पुन्हा पैशांची मागणी केली. संकेत याचा पत्ताही देत नव्हते. त्यामुळे त्याने फिर्यादी, तिचा पती व तिचे आईवडिल यांना जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. त्यांना नांदेड सिटी येथील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवले. चार दिवस डांबून ठेवल्यानंतर २० एप्रिल रोजी रात्री दहा वाजता त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील (API Yuvraj Patil) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Pune Crime News | Pune Crime News: Dattawadi Police Station – Parents kidnapped for not returning money taken by brother! Brother absconded, sister, husband kept in custody

 

हे देखील वाचा :

Dagdusheth Ganpati | ‘दगडूशेठ’ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य; ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये होणार आंब्याच्या प्रसादाचे वाटप (Video)

Basweshwar Jayanti 2023 | महात्मा बसवेश्वर: सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक

Ajit Pawar | पुण्यात अजित पवार यांचे झळकले बॅनर; जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू (Video)

Indian Pest Control Association – IPCA | इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन : आरोग्यदायी घरासाठी ‘पेस्ट कंट्रोल’ गरजेचे; जनजागृती व्हावी

 

Related Posts