IMPIMP

Maharashtra Industries Minister Uday Samant | उद्योग मंत्री उदय सामंत : रांजणगांव एमआयडीसी – इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल

by nagesh
 Maharashtra Industries Minister Uday Samant | Ranjangaon MIDC - Electronic Manufacturing Cluster will generate a large number of jobs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Maharashtra Industries Minister Uday Samant | रांजणगांव येथील औद्योगिक वसाहतीत (Ranjangaon
MIDC) इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर Electronic Manufacturing Cluster (EMC) प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लघु उद्योग सुरू
होऊन तरुणांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज केले. (Maharashtra Industries Minister Uday Samant)

 

रांजणगांव औद्योगिक वसाहत येथील रिया हाऊस येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (इएमसी) व चाकण (Chakan MIDC) व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील (Talegaon MIDC) पायाभूत सुविधासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) पुणे क्षेत्राचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे (Chief Engineer Nitin Wankhede), अधीक्षक अभियंता आर.एस. गावडे (Superintending Engineer R.S. Gawde), कार्यकारी अभियंता दिलीप जोगवे (Executive Engineer Dilip Jogve), मारुती कालकुटकी, संजय कोतवाड, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर आणि स्थानिक उद्योग समूहातील प्रतिनिधी उपस्थित होते. (Maharashtra Industries Minister Uday Samant)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सामंत म्हणाले, रांजणगांव औद्योगिक वसाहतीत केंद्र शासनाने इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प मंजूर केला आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असून या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाने ३४७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर ६५० कोटी रुपयांचा निधी पाईप लाईनसाठी मंजूर केला आहे. प्लग आणि प्लेचे ६० युनिट सुरू करण्यात येत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास ५० एकर जागेत हे क्षेत्र वाढवण्याचा मानस आहे.

 

उद्योग संघटनेने मागणी केलेल्या कौशल्य केंद्रासाठी व कामगार रुग्णालयासाठी प्रत्येकी ५ एकर जागा तसेच पोलिस विभागाच्या कार्यालयासाठी जागा देण्याचे मंजूर केले आहे. पथदिव्यांसाठी १४ कोटी, अंतर्गत रस्त्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
भविष्यात या ठिकाणी हेलिपॅड, कामगारांच्या निवासाची सोय करण्यात येईल.

 

उद्योगांना पोषक वातावरण तयार करण्यासाठी शासनाचे सर्वोपोतरी सहकार्य राहील. राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत यासाठी शासन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना सोई सुविधा, सवलती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येथील उद्योगांनी स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. उद्योगांची वाढ होत असताना परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा वाढत असतात. त्याप्रमाणेच तेथील तरुणांनाही रोजगार मिळाल्यास अशा उद्योगांच्या मागे तेथील स्थानिक युवक उभे राहतील असे सांगून इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, अशा सूचना सामंत यांनी दिल्या.

 

यावेळी मुख्य अभियंता वानखेडे यांनी प्रकल्पाबद्दल माहिती दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Industries Minister Uday Samant | Ranjangaon MIDC – Electronic Manufacturing Cluster will generate a large number of jobs

 

हे देखील वाचा :

Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

Rupali Chakankar | ‘…म्हणून गौतमी पाटील व उर्फी जावेदवर कोणतीही कारवाई करता येत नाही’, रुपाली चाकणकर यांनी सांगितलं कारण

Prof. Dr. Sanjay B. Chordiya | ‘सूर्यदत्त’चे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना राज्यपालांच्या हस्ते ‘सीएसआर अवॉर्ड-2023’ सन्मान प्रदान

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन – अल्पवयीन मुलीला बेशुध्द करून केले लैंगिक अत्याचार

 

Related Posts