IMPIMP

Rupali Chakankar | ‘…म्हणून गौतमी पाटील व उर्फी जावेदवर कोणतीही कारवाई करता येत नाही’, रुपाली चाकणकर यांनी सांगितलं कारण

by nagesh
Rupali Chakankar | rupali chakankar on gautami patil and urfi javed distorting maharashtra culture

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – Rupali Chakankar | गौतमी पाटीलचा (Gautami Patil) डान्स आणि उर्फि जावेदचे (Uorfi Javed) अतरंगी कपडे हे महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय आहे. उर्फीच्या तोडक्या कपड्यावरुन आणि गौतमीच्या अश्लील डान्सवरुन बरचं राजकारण झालं. एकीकडे गौतमीने याबाबत माफी मागितली असताना दुसरीकडे उर्फि विरुद्ध भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांचं प्रकरण चांगलच गाजल होतं. दरम्यान, या दोघींच्या बद्दल राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाष्य केलं आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

 

गौतमी आणि उर्फी जावेद महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विकृतीकरण करत आहेत का? असा प्रश्न रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, गौतमी काय करते ते नृत्य (Obscene Dance) नाही, पण या प्रकरणात राज्य महिला आयोगाला ज्या तक्रीरी प्राप्त होतात, त्या तक्रारीची दखल घेऊन महिला आयोग संबंधित व्यक्ती, संबंधित विभाग किंवा संस्था यांच्याकडे पाठवत असते. मात्र राज्यघटनेने (Constitution) तुम्हाला, मला जो व्यक्ती स्वातंत्र्याचा (Individual Freedom), भाषा स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणी काय घालवं, काय बोलाव आणि काय खावं, हे कोणी कोणाला सांगू शकत नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एखादी गोष्ट अश्लील वाटत असेल तर

घटना तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत असताना शील व अश्लील याची परिभाषा आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट अश्लील वाटत असेल तर दुसऱ्याला ती गोष्ट शील वाटते. त्यामुळे ही परिभाषा स्थळ, काळ वेळपरत्वे बदलत राहते. याबाबत कोणतीही स्पष्ट व्याख्या कायद्यात नसल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

 

 

म्हणून त्यांच्यावर कारवाई करु शकत नाही

गौतमी आणि उर्फी या दोघीही तुमच्या दृष्टीकोनातून अश्लील वाटत असल्या तरी दुसऱ्यांच्या नजरेत त्या शील
असू शकतात. म्हणून आपण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करु शकत नाही, मात्र, त्यांना समज देऊ शकतो.
कायदा व सुव्यवस्था पाहता त्यासाठीचे काही परिणाम ठरले आहेत.
त्यापलीकडे जाऊन आपण कोणती कारवाई करु शकत नसल्याचे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

 

 

Web Title :-  Rupali Chakankar | rupali chakankar on gautami patil and urfi javed distorting maharashtra culture

 

हे देखील वाचा :

Prof. Dr. Sanjay B. Chordiya | ‘सूर्यदत्त’चे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना राज्यपालांच्या हस्ते ‘सीएसआर अवॉर्ड-2023’ सन्मान प्रदान

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन – अल्पवयीन मुलीला बेशुध्द करून केले लैंगिक अत्याचार

Bribe Demand Case On Mahila Talathi | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 20 हजाराच्या लाच प्रकरणी महिला तलाठीविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

 

Related Posts