IMPIMP

Maharashtra Monsoon 2022 Update | मान्सूनची राज्यात विश्रांती, जोरदार सलामीनंतर झाले तरी काय ?

by nagesh
Rain in Maharashtra | journey back to monsoon from the state was long rain updates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Monsoon 2022 Update | मान्सूनने धमाकेदार सलामी दिल्यानंतर त्याने पुन्हा विश्रांती घेतली आहे. यावर्षी पाऊस चांगला होईल, तसेच 15 जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार बरसेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील दोन दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मान्सूनने विश्रांती का घेतली

भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, येत्या 48 तासांत तयार होणार्‍या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. पण सध्या मान्सूनला लो करंट आहे. म्हणून पाऊस पडण्यासाठी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची गरज आहे, अशी स्थिती तयार होत नसल्याने सध्या मान्सूनने  विश्रांती घेतली आहे. मान्सूनने सुरूवातीलाच विश्रांती घेतल्यामुळे शेतकर्‍यांना पेरणी थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Monsoon 2022 Update)

 

येथे थांबला पाऊस

यावर्षी 29 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला. त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटकचा काही भाग, आणि गोव्याच्या सीमेवर दाखल झाला. यावेळीही मान्सूनने दहा दिवसांची विश्रांती घेतली होती. हवामान अनुकूल झाल्यानंतर मान्सून शुक्रवारी वेंगुर्ल्यात दाखल झाला. त्यानंतर अवघ्या 24 तासांत म्हणजे शनिवारी मान्सून मुंबई, ठाणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय झाला. पण रविवार, सोमवार आणि मंगळवारी पाऊस गायब झाला असून, राज्याच्या अनेक भागात पुन्हा उकाडा जाणवत आहे.

 

5 दिवसांत वादळी पाऊस

पश्चिम किनारपट्टीवर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वार्‍यांच्या प्रभावाखाली येत्या 5 दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वार्‍यासह वादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

येत्या पाच दिवसात पावसाची स्थिती असेल

हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की,
अरबी समुद्रात गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर द्रोणीय स्थिती तसेच पश्चिमेकडून वाहणारे वारे यामुळे कोकण,
गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांमध्ये पावसाची उपस्थिती असेल.

 

Web Title :- Maharashtra Monsoon 2022 Update | Maharashtra monsoon 2022 update maharashtra rain methodological department information about rainy season

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार रोहन जगताप 6 महिन्यांसाठी तडीपार

What Is Difference Between Heart Attack And Cardiac Arrest | Cardiac Arrest आणि Heart Attack मध्ये काय आहे फरक? जाणून घ्या कोणत्या आजारापासून किती धोका

Hair Care Tips | आपल्या केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आत्ताच ‘या’ सवयी लावून घ्या

 

Related Posts