IMPIMP

Maharashtra Municipal Election 2022 | राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अशक्य – इलेक्शन कमिशनची माहिती

by nagesh
Pune News | Digital media in Pune were denied passes to reporters while Digital India was being empowered

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Municipal Election 2022 | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत (Maharashtra Municipal Election 2022) काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. राज्यातील प्रलंबित असणा-या निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करा असा आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. तसेच या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) घ्या, असं देखील न्यायालयाने सांगितलं. यामुळे राज्यातील आघाडी सरकारला एक धक्का मानला जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

न्यायालयाच्या आदेशानंतर आता राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
परंतु, या निवडणुका सप्टेंबर अखेरपर्यंत होणे अशक्य असल्याचं आयोगाने सांगितले आहे.
याबाबत माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर (Kiran Kurundkar) यांनी दिली.
”राज्यात पावसाळ्यात निवडणुका शक्य नाही. कारण निवडणुकीच्या पहिल्या 3 टप्प्यांचे कामे छताखाली होत असतात.
पण मतदान मात्र पावसाळ्यात शक्य नसते. कारण जुलै – ऑगस्टमध्ये आपल्याकडे भरपूर पाऊस असतो.
मुंबई कोकणात तर फारच पाऊस असतो त्यामुळे निवडणुका पावसाळ्यात शक्य नाहीत.” असं ते म्हणाले. (Maharashtra Municipal Election 2022)

 

पुढे सचिव कुरुंदकर यांनी सांगितलं की, ”निवडणुकीचे एकूण 4 टप्पे असतात. पहिला प्रभाग रचनेचा, दुसरा आरक्षण सोडत, तिसरा मतदार याद्या आणि चौथा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे या चारही टप्प्यांना मिळून किमान 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागतो.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर 30 ते 40 दिवस लागतात.” अशी त्यांनी माहिती दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra Municipal Election 2022 | election commission maharashtra local body election voting is not possible in the state till the end of september 2022

 

हे देखील वाचा :

Salman Khan Net worth | 2300 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ‘दबंग’ सलमान खान, लग्न झाले नाही तर हा असेल ‘भाईजान’चा वारस

NCP Chief Sharad Pawar | ‘कोरेगाव भीमा दंगलीला तत्कालीन फडणवीस सरकार जबाबदार’

Koregaon Bhima Case | कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडेंना जयंत पाटील यांच्यामुळे ‘क्लिनचिट’, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

 

Related Posts