IMPIMP

Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’; मुंबईत गेल्या 24 तासात 71 पोलिसांना कोरोना

by nagesh
Maharashtra Police | Maharashtra police above 55 years age will work from home due to covid omicron coronavirus

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनकोरोनाच्या (Corona) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले. कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने (State Government) महाराष्ट्र पोलिसांसाठी (Maharashtra Police) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पोलीस दलातील 55 वर्षावरील कर्मचाऱ्यांना आता ‘वर्क फ्रॉम होम’चे (Work From Home) आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यामुळे आता पोलीस दलाला कमी मनुष्यबळ उपलब्ध असेल. परंतु कोरोनाच्या यापूर्वीच्या लाटे वेळी पोलीस दलाने अशाच प्रकारे काम केल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबईत गेल्या 24 तासात 71 पोलिसांना (Maharashtra Police) कोरोनाची लागण झाली आहे. सक्रीय पोलीस (Mumbai Police) रुग्णांची संख्या 265
वर पोहचली आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंत 123 पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावाव लागला आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी टास्क फोर्स (Task Force) आणि आरोग्य खात्याची (Health Department) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी वाढत्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे कसे जायचे,याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ओमायक्रॉनच्या (Omycron) लाटेत डॉक्टर, रुग्णालयातील अन्य कर्मचारी आणि पोलिसही अधिक प्रमाणात सापडण्याची शक्यता असून त्यामुळे मोठा ताण येऊ शकतो. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी आतापासूनच कठोर उपाययोजना करण्यावर बैठकीत चर्चा झाली.

 

 

मुंबईत 230 डॉक्टर कोरोनाबाधित

मागील काही दिवसांत मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या 230 डॉक्टर्सना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये जेजे रुग्णालयातील (J J Hospital Mumbai)- 51. लो. टिळक रुग्णालय (Lokmanya Tilak Hospital) -35, केईएम (KEM) -40, नायर (Nair Hospital) -35 निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. डॉक्टर्स वेगाने कोरोना बाधित होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Maharashtra Police | Maharashtra police above 55 years age will work from home due to covid omicron coronavirus

 

हे देखील वाचा :

Fitness Tips | बॉलिवूड अभिनेता विकी कौशलकडून जाणून घ्या ‘या’ 5 फिटनेस टिप्स

Pune Crime | पोटगी घेण्यासाठी आलेल्या महिलेशी अश्लिल वर्तन करुन विनयभंग; डेक्कन जिमखान्यावरील धक्कादायक घटना

Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित

 

Related Posts