IMPIMP

Maharashtra Police Transfer | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय व्हायरल, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

by nagesh
Maharashtra Police Recruitment | seven thousand policemen will be recruited in maharashtra police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Police Transfer | राज्यातील सरकारी अधिकारी आणि प्रशासनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM
Uddhav Thackeray) यांचा वचक नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला
आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या (Maharashtra Police) बदल्यांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल (List Goes Viral) होत आहे. परंतु राज्य सरकारने अशी कोणतीही यादी प्रसिद्ध केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची (Maharashtra Police Transfer) ही यादी नेमकी कोणी बाहेर लीक केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश (Inquiry Orders) दिले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची (Maharashtra Police Transfer) यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु यावर मुख्यमंत्र्यांची सही नाही. मुख्यमंत्र्यांची सही होण्यापूर्वीच कोणीतरी ही यादी सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केल्याची चर्चा आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, राज्य सरकारकडून बदल्यांची (Transfer) कोणतीही यादी जाहीर करण्यात आलेली नव्हती किंवा तसा कोणताही प्रस्ताव नव्हता. कोणीतरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने ही यादी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. सहा महिन्यापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली.

 

दरम्यान, मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात एका व्यक्तीने मंत्रालयात फोन करुन शरद पवार (Sharad Pawar) यांचा हुबेहूब आवाज काढत फोनवरील व्यक्तीने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी खातरजमा करण्यासाठी शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकशी (Silver Oak) संपर्क साधला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Maharashtra Police Transfer | maharashtra police senior officers transfers fake list viral on social media home minister dilip walse patil orders probe

 

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | पाचवीच्या विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र; जाणून घ्या काय म्हंटले आहे ‘या’ पत्रात

Multibagger Penny Stock | एक रुपयांच्या स्टॉकने अवघ्या 1 वर्षात दिला 7000% रिटर्न, रू. 1 वरून वाढून झाला रू. 71 चा, तुमच्याकडे आहे का?

Omicron Genetic Pattern | बिहारमध्ये आढळला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जेनेटिक पॅटर्न BA-2; डेल्टापेक्षा सातपट अधिक संसर्ग

 

Related Posts