IMPIMP

Maharashtra NCP Political Crisis | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष! ठराव मंजूर; निवडणूक आयोगाच्या कागदपत्रातून मोठा खुलासा

by nagesh
Maharashtra NCP Political Crisis | ajit pawar letter to election commission of india on sharad pawar ncp

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra NCP Political Crisis | अजित पवार (Ajit Pawar) हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून तसं पत्र निवडणूक आयोगामध्ये (Election Commission) दाखल करण्यात आलं आहे. तशा आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण राष्ट्रवादीवर दावा केल्याचे स्पष्ट झालं आहे. (Maharashtra NCP Political Crisis)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष (Ajit Pawar NCP President) असल्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचं या पत्रात नमूद केलं आहे. यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 30 जून रोजीचे राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्यांचे पत्रदेखील अजित पवार यांनी आज (बुधवार 5 जुलै) दाखल केल्याची माहिती आहे. यामध्ये पक्षावर दावा करण्यात आला आहे. आता हा निर्णय निवडणूक आयोगाकडे गेल्याने शरद पवारांना कायदेशीर लढाई लढावीच लागणार आहे. याबाबतची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये,
अशी मागणी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे.
त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सर्व प्रकरणाकडे पाहता ही शिवसेना (Shivsena) फुटींतरच्या प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचे दिसून येत आहे.

Web Title : Maharashtra NCP Political Crisis | ajit pawar letter to election commission of india on sharad pawar ncp

Related Posts