IMPIMP

Maharashtra Political Crisis | नरहरी झिरवाळ अ‍ॅक्शन मोडमध्ये ! शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर कारवाईला सुरुवात

by nagesh
Maharashtra Political Crisis maharashtra assembly deputy speaker narhari zirwal sent notice to 16 rebel shivsena mla

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांवर अपात्र ठरवावं अशी मागणी शिवसेनेने (Shivsena) विधानसभा उपाध्यक्षांकडे (Assembly Deputy Speaker) केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत मांडण्यासाठी सांगण्यात (Maharashtra Political Crisis) आलं आहे. या आमदारांनी (MLA) त्यांचे मत मांडलं नाही, तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे. आजपासून सर्वांना नोटिस (Notice) बजावण्यात आली आहे. या आमदारांना सोमवारी 27 जून पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास अपात्र ठरवण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर आता हे बंड मोडून काढण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र (Ineligible) ठरवण्याची मागणी केली होती. त्यासाठीचा अर्ज विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आला होता. त्यानंतर आज विधानसभा उपाध्यक्षांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या आमदारांना आता सोमवारी 27 जून पर्यंत 5.30 वाजेपर्यंत नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे. या कालावधीत नोटिसीला उत्तर दिले नाही तर या नोटिसीवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Political Crisis)

कोणत्या आमदारांना नोटीस
एकनाथ शिंदे (Eknath Shinde), तानाजी सावंत (Tanaji Sawant), प्रकाश सुर्वे (Prakash Surve), बालाजी किणीकर (Balaji Kinikar), अनिल बाबर (Anil Babar), लता सोनवणे (Lata Sonawane), यामिनी जाधव (Yamini Jadhav), संजय शिरसाट (Sanjay Shirsat), भरत गोगावले (Bharat Gogavale), संदिपान भुमरे (Sandipan Bhumare), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), महेश शिंदे (Mahesh Shinde), चिमणआबा पाटील (Chimanaba Patil), संजय रायमूलकर (Sanjay Raymulkar), बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar), रमेश बोरणारे (Ramesh Boranare)

Web Title :- Maharashtra Political Crisis | maharashtra assembly deputy speaker narhari zirwal sent notice to 16 rebel shivsena mla

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :


Related Posts