IMPIMP

Maharashtra Political Crisis | ‘आधी निकाल येऊ द्या, मग आपले ज्ञान पाजळा’- संजय शिरसाट

by nagesh
Maharashtra Political Crisis | shinde-group-sanjay-shirsat-reaction-about- supreme-court-hearing-on-maharashtra-political-crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) गुरुवारी निकाल जाहीर करणार आहे. अवघ्या काही तासात निकाल जाहिर होणार असून राज्याच्या राजकारणात (Maharashtra Political Crisis) घडामोडींना वेग आला आहे. यातच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group) निकाल आपल्याच बाजूने लागेल असा दावा केला आहे. तर शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी आधी निकाल येऊ द्या मगच सर्वांनी आपले ज्ञान पाजळावे, असे म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि सुरुवातीपासून या प्रकरणाच्या प्रक्रियेत भाग असलेले अनिल देसाई (MP Anil Desai) यांनी उद्याच्या निकालाबाबत भाष्य केलं आहे. न्यायालयाचा निकाल (Maharashtra Political Crisis) भारताची लोकशाही समृद्ध करणारा असले. हा निकाल आमच्या बाजुने लागेल, अशी आम्हाला खात्री आहे. या निर्णयाची संपूर्ण जग वाट पाहत आहे. याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. सत्तासंघर्षाच्या प्रत्येक सुनावणीला हजर होतो. या निकालावेळीही दिल्लीत असेन. जी जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी मी पार पाडेन. सर्वोच्च न्यायालय भारतीय संविधानाला (Indian Constitution) धरुन आणि भारताची लोकशाही (Democracy of India) समृद्ध करणारा निकाल देईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. संविधानात ज्या तरतूदी आहेत. त्या तरतुदींप्रमाणेच निर्णय ते देतील अशी खात्री आहे. न्यायालय जो निर्णय देईल त्याचे आम्ही स्वागत करु, असे अनिल देसाई यांनी म्हटले.

 

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, आधी निकाल येऊ द्या मगच सर्वांनी आपले ज्ञान पाजळावे. सर्व जण सुप्रीम कोर्टाचे जज असल्यासारखे प्रतिक्रिया देत आहेत. निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल. कारण आम्ही काही चुकीचे केलेले नाही. आता धास्ती कोणाला आहे तर ठाकरे गटाच्या आमदारांना आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असे शिरसाट यांनी म्हटले.

 

विरोधक, कायदे तज्ज्ञ जे बोलत आहेत त्यांना माझा सल्ला आहे थोड थांबा. मग बोला. संजय राऊत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत,
त्यांना आपल्या पक्षासाठी बोलावं लागतं. पण आधी निकाल येऊ द्या, मग बोला. सर्वांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत.
आपण हे सगळे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केले जाईल अशी खरी प्रक्रिया आहे. त्यामुळे यासंदर्भातला निकाल हे अध्यक्षच लावतील,
असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shinde-group-sanjay-shirsat-reaction-about-
supreme-court-hearing-on-maharashtra-political-crisis

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढवणार’ – देवेंद्र फडणवीस

Drug Free Mumbai | ‘ड्रग्ज्स फ्री मुंबई’साठी धडक मोहिम ! अंमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहिम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Lonikand Police Station | पुणे क्राईम न्यूज : 3 कामगारांच्या मृत्यूप्रकरणी वाघोलीतील मंडप साहित्याच्या गोडावुनचा मालक आशिष आग्रवालला अटक

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार, मंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, ते 16 आमदार कोण? संपूर्ण यादी

 

Related Posts