IMPIMP

Maharashtra Political Crisis | बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा

by nagesh
Maharashtra Political Crisis | shivsena balasaheb thackerays grandson Nihar Thackeray supports eknath shinde nihar thackeray entry in politics

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेचे आमदार
(Shivsena MLA), खासदार (MP), नगरसेवक आणि पदाधिकारी पक्ष सोडून जात असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चिंता
वाढवणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. कारण ठाकरे घराण्याचे वारसदार आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नातू
निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना (Maharashtra Political Crisis) पाठिंबा दिला आहे. एवढेच नाही तर निहार ठाकरे हे
एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वात आता राजकारणातही प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्यातील आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.

 

निहार ठाकरे हे बिंदुमाधव ठाकरे (Bindumadhav Thackeray) यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटाच्या (Shinde Group) भारतीय सेनेचे पदाधिकारी किरण पावसकर (Kiran Pavaskar) हे देखील उपस्थित होते. निहार ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश (Maharashtra Political Crisis) केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आणखीनच हवा मिळू शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

निहार ठकरे हे भाजप नेते हर्षवर्धन पाटील (BJP Leader Harshvardhan Patil) यांचे जावई आहेत.
काही महिन्यांपूर्वीच निहार ठाकरे आणि अंकिता पाटील (Ankita Patil) यांचा विवाह झाला होता. त्यानंतर निहार हे राजकारणात आपलं नशीब आजमावणार आहेत. निहार ठाकरे हे आतापर्यंत राजकारणात कधीच सक्रिय नव्हते. नुकतीच स्मिता ठाकरे यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यादेखील शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा होती.

 

Web Title : –  Maharashtra Political Crisis | shivsena balasaheb thackerays grandson Nihar Thackeray supports eknath shinde nihar thackeray entry in politics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अंमली पदार्थीची विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, 1 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

Business News | लक्षात ठेवा ! 1 ऑगस्टपासून बदलतील तुमच्या बँकेशी संबंधीत ‘हे’ नियम, खिशावर होईल थेट परिणाम

WhatsApp वर सुरू आहे ‘खतरनाक स्कॅम’, कधीही करू नका ‘ही’ चूक

 

Related Posts